(Source: Poll of Polls)
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड?
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाडचे पुनरागमन झाले आहे. त्याची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

India A Squad vs South Africa ODI 2025 : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे क्रिकेट मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा केली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाडचे (Ruturaj Gaikwad) पुनरागमन झाले आहे. त्याची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचं नेतृत्व करणार आहे. तर उपकर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड नेतृत्व करणार आहे.
अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांना देखील संघात स्थान मिळाले आहे. यष्टीरक्षक म्हणून इशान किशन आणि प्रभसिमरन सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध कृष्णाचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी भारत 'अ' संघात कोणा-कोणाला संधी?
तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, इशान किशन (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, निशांत सिंधू, विप्रज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि खलील अहमद.
महत्वाच्या बातम्या:



















