एक्स्प्लोर
Pawar Politics: 'अजित दादांवर नाराज, पण खरा राग भाजपवर', रोहित पवारांच्या विधानाने काका-पुतणे एकत्र येणार?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे जुळवण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे गट पुन्हा एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'आमच्या पक्षाला आणि पवार साहेबांना सोडल्यामुळे आम्ही अजित दादांवर नाराज आहोत, पण नाराजीपेक्षा खरा राग हा आमचा भाजपबरोबर आहे,' असे स्पष्ट मत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना स्थानिक परिस्थिती पाहून भाजप (BJP) वगळता कोणत्याही पक्षासोबत युती करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना किंवा मनसे यांच्यासोबत आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित पवार यांच्या विधानामुळे भाजपविरोधात सर्व पवार कुटुंबीय एकत्र येऊ शकतात, या चर्चेला उधाण आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रिकेट
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement















