एक्स्प्लोर

'रामायण' मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, 82व्या वर्षी अखेरचा श्वास

Arvind Trivedi Passed Away : रामानंद सागर कृत 'रामायण' या लोकप्रिय मालिकेत रावणाची भूमिका साकरणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच निधन, 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Arvind Trivedi Passed Away : 1987 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका 'रामायण'मधील रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत होते. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी एबीपी न्यूजसोबत फोनवरुन झालेल्या संभाषणात अरंविद त्रिवेदी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, "अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून आजारी होते. गेल्या 3 वर्षांपासून ते शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करत होते. अशातच दोन ते तीन वेळा त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयातही दाखल करावं लागलं होतं. साधारणतः महिन्याभरापूर्वी ते उपचारानंतर घरी परतले होते. मंगळवारी रात्री 9 ते 9.30 दरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळं मृत्यू झाला. मुंबईतील कांदिवली येथील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला." तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, "अरविंद त्रिवेदी यांच्यावर सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील."

रामानंद सागर कृत 'रामायण' या लोकप्रिय मालिकेपासूनच अरविंद त्रिवेदी यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. त्यांनी साकारलेली रावणाची भूमिका लोकांच्या मनात इतकी ठसली होती की, त्यांना खऱ्या आयुष्यातही त्यांच्या भूमिकेवरुन ओळखू लागले होते. 'रामायण'मध्ये काम करण्यापूर्वी गुजरातीत त्यांनी शेकडो नाटकं आणि चित्रपटांमधून अभिनय केला होता. अरविंद त्रिवेदी यांना कल्पना नव्हती की, रामायणातील त्यांची भूमिका इतकी लोकप्रिय होईल. 

रामायण मालिकेनंतर अरविंद त्रिवेदी यांनी 'विक्रम और बेताल' या हिंदी मालिकेतही काम केलं होतं. याशिवाय त्यांनी टेलिव्हिजन विश्वातील अनेक चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयानं ठसा उमटवला. मात्र आजही त्यांना रामायण मालिकेत त्यांनी साकारलेल्या रावणाच्या भूमिकेमुळं ओळखलं जातं. त्यांनी 300 हून अधिक गुजराती आणि हिंदी चित्रपटांमधून काम केलं आणि अनेक गुजराती नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रामायणातील भूमिकेच्या यशानंतर त्यांना भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी तिकीटही देण्यात आलं होतं. त्यांनी गुजरातच्या साबरकांठामधून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि बहुमतानं विजयी देखील झाले. 1991 ते 1996 पर्यंत ते लोकसभेत खासदार होते. दरम्यान, अरविंद त्रिवेदी यांच्या बंधू उपेंद्र त्रिवेदीही गुजराती रंगमंच आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : मागील 15 कसोटीत फक्त एका अर्धशतकासह अवघ्या 619 धावा; कॅप्टन रोहित कसोटी फॉर्मेटमधून निवृत्त होणार? पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
मागील 15 कसोटीत फक्त एका अर्धशतकासह अवघ्या 619 धावा; कॅप्टन रोहित कसोटी फॉर्मेटमधून निवृत्त होणार? पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या; वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या; वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
Koregaon Bhima Shaurya Divas 2025: कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
''प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला; वाल्मिक कराडला अटक झाली का नाही, हे मला माहिती नाही''
''प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला; वाल्मिक कराडला अटक झाली का नाही, हे मला माहिती नाही''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंच्या सुरेश धस यांना कानपिचक्याTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaNashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीतPune Pub Condom : कंडोम अन् ORS चे पाकीट वाटप, पुण्यातील हाय स्पिरिट पबचा कारनामा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : मागील 15 कसोटीत फक्त एका अर्धशतकासह अवघ्या 619 धावा; कॅप्टन रोहित कसोटी फॉर्मेटमधून निवृत्त होणार? पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
मागील 15 कसोटीत फक्त एका अर्धशतकासह अवघ्या 619 धावा; कॅप्टन रोहित कसोटी फॉर्मेटमधून निवृत्त होणार? पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या; वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या; वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
Koregaon Bhima Shaurya Divas 2025: कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
''प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला; वाल्मिक कराडला अटक झाली का नाही, हे मला माहिती नाही''
''प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला; वाल्मिक कराडला अटक झाली का नाही, हे मला माहिती नाही''
Elon Musk on H-1B Visa : H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार
Yashasvi Jaiswal Wicket Controversy : OUT की NOT OUT... यशस्वी जैस्वालच्या विकेटवर गोंधळ, रवी शास्त्री म्हणाले, SNICKO ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज....
OUT की NOT OUT... यशस्वी जैस्वालच्या विकेटवर गोंधळ, रवी शास्त्री म्हणाले, SNICKO ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज....
Udayanraje Bhosale : शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
Embed widget