एक्स्प्लोर

Rental Family Movie Review: रेंटल फॅमिली - आधुनिक नातेसंबंधांचा आरसा

Rental Family Movie Review: हिरोकाझू कोरे-एडा हे जपानचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी बदलत्या जपानवर अनेक सिनेमे बनवलेत. त्याच्या सिनेमात जपानच्या समाजव्यवस्थेवर कमेंट असते. आधुनिकता आणि त्यातून तयार झालेली आत्मकेंद्री वृत्ती यावर फोकस असतो. या विषयांच्या अंतर्गत त्यांनी नोबडी नोज (2004), एअर डॉल (2009), मॉनस्टर (2023), शॉपलिफ्टींग (2018) सारखे महत्त्वाचे सिनेमे बनवले.  हे सिनेमे जगभरात गाजले. यापैकी एअर डॉल (2009) हा सिनेमा फार महत्त्वाचा म्हणावा लागेल. सतत काम, बिघडलेले कौटुंबिक नातेसंबंध आणि त्यातून आलेलं एकाकीपण घालवण्यासाठी एक कामगार एअर डॉल खरेदी करतो. कुठल्याही सुढौल बाईच्या आकाराची ही एयर डॉल आता त्याचं जग आहे. तो तिच्यासोबत बोलतो, हसतो, गातो, सेक्स करतो. ती रबराची ही एअर डॉल त्याचं जग बनते. आणि एक दिवस तिच्यात जीव येतो. तिला भावना येतात, तेव्हा तिची निवड काय असते? असं थोडसं फॅन्टसी आणि आधुनिक जपान कुटुंबव्यवस्थेतली क्लिष्टता हिरोकाझू कोरे-एडा यांनी चांगल्या पद्धतीनं दाखवली आहे. 

आधुनिक शहरात एकटेपणा हा एक मोठा आजार आहे. हे एकटे लोक मग ह्युमन कनेक्शन शोधायला लागतात.  आसपास माणसं शोधतात. एकटेपणाने आलेली पोकळी ही तात्कालीन समाजाचं प्रतिक आहे. समाज आतून पोकळा झालाय. यातूनच मग अनैसर्गिक नाती तयार करण्याची गरज भासते.  हिरोकाझू कोरे-एडानं आपल्या एअर डॉल सिनेमातून हेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जपानमध्ये सेक्स टॉय हा प्रकार खुप आधीपासून आला आहे. आपल्या भारतात ते अवैध आहे. पण जपानमध्ये खुलेआम सेक्स टॉय वापरले जातात. त्यातून तेवढ्या पुरतं आपल्या उत्कट भावनांना मार्ग करुन दिला जाऊ शकतो. पण शेवटी ह्युमन कनेकशन जरुरी असतं. रबरी एअर डॉलबरोबर सेक्स केल्यानंतर तिच्याशी बोलणार कसं? ना तिला आवाज, ना स्पर्शाची जाणीव, शेवटी माणूस हा इमोशनल प्राणी आहे. त्याला आपल्या भावना शेअर करण्यासाठी कुणीतरी माणूसच लागतं. उबदार मिठी लागते, हातात हात लागतो. कुणाचा तरी खांदा लागतो. अनेकदा ते भिन्न लिंगी असतं. भिन्न लिंगी असलं तर त्यातून भावनांचा निचरा होण्याची शक्यता जास्त असते. 

या सर्व परिस्थितीत जपानमध्ये असं इमोशनल शेअरींगसाठी आणि एकूणच तुमची पोकळी कमी करण्यासाठी रेंटल फॅमिली नावाची कंपनी सुरू झाली. आता रेंटल फॅमिलीसारख्या अनेक कंपन्या एकाकी लोकांना ह्युमन कनेक्शन पुरवतात. आज एखाद्याला रेंट करणं हा एक व्यवसायाचा भाग आहे. म्हणजे भावनिक शेअरींगसाठी माणसं भाड्यानं घेण्याची पद्धत. सध्या जपानमध्ये असं भाड्यानं माणसं पुरवण्याचा धंदा फुल्ल फॉर्ममध्ये आहे. अगदी परदेशातून लोकं इथं ह्युमन कनेक्शन रिसोर्स म्हणजे एखाद्याची भावनिक पोकळी भरुन काढण्यासाठी येतात. म्हणजे काय तर भाडेतत्वावर तयार असलेला हाडामासांचा माणूस. 

Rental Family Movie Review: रेंटल फॅमिली - आधुनिक नातेसंबंधांचा आरसा

हिकारी या जापनिज दिग्दर्शिकेचा नवा सिनेमा रेंटल फॅमिली (2025) याच रेंटल ह्युमन कनेक्शन उद्योगाची गोष्ट उलगडून सांगतो. जपान आणि अमेरिका असं को-प्रोडक्शन असलेला या सिनेमाला बऱ्यापैकी अमेरिकन प्रस्पेक्टिव्ह आहे. पण तो अस्सल जपानी समाजातल्या रेंटल फॅमिली सिस्टमवर बोट ठेवतो. आता हे ह्युमन कनेक्शन वेगवेगळ्या कारणासाठी रेंट केले जातात. म्हणजे नवरा नसेल तर मुलांना त्यांचा बाप जिवंत आहे हे सांगण्यासाठी एखादा नवराच भाड्यानं घेणं. बायकोबरोबर संबंध तोडायचे असल्यास एक गर्लफ्रेंड भाड्यानं घेणं, एकटं असल्यास फक्त गप्पा मारण्यासाठी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड घेणं. प्रार्थनासभेत रडण्यासाठी आणि आपल्याबद्दल चांगलं चांगलं बोलण्यासाठी अनेकदा मृत्यूपूर्वीच आपल्या जाण्याची तयारी कशी करायची याची रंगीत तालिम असे ह्युमन कनेक्शन भाड्यानं घेऊन केली जाते. 

अमेरिकेतला एक अपयशी कलाकार जपानमध्ये येऊन अशी सेवा देतोय. कधी कुणाचा बाप, कधी कुणाचा मित्रं, तर कधी एखाद्या म्हाताऱ्या अभिनेत्याचा सहकारी अशी बरीच कामं त्याला मिळतात. एका लेस्बियन मुलीशी तो खोटं खोटं लग्न ही करतो. त्यानंतर जेव्हा तिची पार्टनर रुमवर येते तेव्हा तो निघतो आणि वेश्येकडे जातो. आपण जे काय करतोय ते खुप वाईट असल्याचं, आणि त्याबद्दल वाईट वाटत असल्याचं तो त्या वेश्येला सांगतो. ती म्हणते, "मी शरीर विकते, तू इमोशन विकतोस. नको जास्त विचार करू. जस्ट गो विथ फ्लो"

वाढत्या नागरीकरणाचे आणि त्यातून आलेल्या एकटेपणावर अनेक सिनेमे बनलेत. नुकताच गाजलेल्या पायल कपाडियाच्या ऑल वुई इमॅजिन एज लाईट (2024) या सिनेमातही या एकटेपणाबद्दल सुंदर भाष्य आहे. नवऱ्याच्या आठवणीत राईस कुकरला कवेत, मांडीत घेण्यारी नर्स प्रभा आणि मुंबईसारख्या शहरात इतकी वर्ष राहुनही उपरी ठरलेली पार्वती ही दोन्ही पात्र शहरात मिसफिटपणा अनुभवत असतात. 

Rental Family Movie Review: रेंटल फॅमिली - आधुनिक नातेसंबंधांचा आरसा

सोफिया कपोलाचा लॉस्ट इन ट्रान्सलेशन (2003) हा सिनेमा टोकयोतल्या दोन परदेशी माणसांची गोष्ट सांगतो. एका प्रदर्शनात ते दोघे भेटतात आणि लगेच एकत्र येतात. एकटेपणा दूर करण्यासाठी मग वारंवार भेटत राहतात. तिचा नवरा फोटोग्राफर आहे. त्याला तिच्यासाठी वेळ नाही. मग ती असा आपला नवा इमोशनल पार्टनर शोधते. त्यातून मानसिक ओढाताण होते. अशा संबंधांची परिणीती ही अशीच असते. 

Rental Family Movie Review: रेंटल फॅमिली - आधुनिक नातेसंबंधांचा आरसा

जॅसन रीतमॅन या अमेरिकन दिग्दर्शकाच्या अप इन द एअर (2009) या सिनेमात सतत फिरतीवर असणारा तो आणि ती असेच भेटतात आणि त्यातून त्यांची मैत्री होते. तो तिला भेटायला अचानक तिच्या घरी येतो.  ती दार उघड़ते. ती आपल्या कुटुंबासोबत असते. त्याला परतवून लावते. नंतर फ़ोन करते, म्हणते ते माझं कुटुंब आहे. तू अचानक यायला नको होतंस. तो म्हणतो आपल्या दोघांचं कुटुंब आहे असं मी समजत होतो. ती म्हणते नाही. जे आपल्या दोघात आहे ती आपली एडजस्टमेन्ट आहे. तसं भेटायचं असल्यास पुन्हा फोन कर. 

Rental Family Movie Review: रेंटल फॅमिली - आधुनिक नातेसंबंधांचा आरसा

वाँग कार वॉय शहरांमधल्या नातेसंबंधांची गोष्ट सांगण्यात पटाईत आहे. इन द मुड फॉर लव (2000) मध्ये अशीच दोघं एकत्रं येतात. या दोघांच्या नवरा-बायकोचं एकमेकांशी संबंध आहे. अडल्टरीचे शिकार आहेत. पण पुढे ते स्वताच एकत्र येतात.

Rental Family Movie Review: रेंटल फॅमिली - आधुनिक नातेसंबंधांचा आरसा

माय ब्लुबेरी नाईटस (2008) या सिनेमात वाँग कार वॉयनं अश्या नातेसंबंधांना अमेरिकन प्रस्पेक्टिव्ह दिलाय. एकूणच गर्दी राहूनही एकटेपण वाढत जातोय हे जागतिक सत्य आहे. त्यातून मग रेंटींग फॅमिलेसारखे बिजनेस तयार होतायत. यातून माणसाचं पुढे नक्की काय होईल याची शास्वती नाही. जे जसं सुरु आहे ते तसं सुरुच राहु द्यायचं. जस्ट गो विथ फ्लो.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Kalate Pimpri Election: राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025  : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Kalate Pimpri Election: राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Embed widget