Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
Solapur Flood Central Team Night Inspection : सोलापुरातील केंद्रीय पथकाच्या 'रात्रीच्या पाहणी'ची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. त्या पथकाने आमचं काहीही ऐकून घेतलं नसल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं.

सोलापूर : केंद्रीय पथकाने रात्रीच्या अंधारात मोहोळ तालुक्यातील नुकसानीची पाहणी (Central Team Night Inspection) केल्यामुळे आता ग्रामस्थांमधून नाराजी तसेच संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या अंधारात पथकाला काय दिसलं? पथकाने एकाच ठिकाणी उभारुन टॉर्चच्या प्रकाशात काय पाहिलं? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. पथकाने आपलं काहीच ऐकून घेतलं नाही, त्यांचं त्यांचंच हिंदीमध्ये काहीतरी चालू होतं अशी तक्रारही ग्रामस्थांनी केली.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे केंद्रीय पथकाने केलेली नुकसानीची पाहणी आता वादात सापडली आहे. या पथकाने रात्रीच्या अंधारात ही पाहणी केली, तसेच रस्ता सोडून ते खालीही उतरले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
Central Team Solapur Inspection : टॉर्चच्या प्रकाशात काय दिसलं?
रस्त्यावरून पाहणी करून काय दिसणार? पथकाने केवळ रस्त्यावरून उभं राहून टॉर्च लावून पाहणी केली, पथकातील सदस्यांनी आमचं ऐकून देखील घेतलं नाही अशी तक्रार एका गावकऱ्याने केली.
सीना नदीला यंदा मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामध्ये मोहोळ तालुक्यातील कोळेगावमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं. याच नुकसान पाहणीसाठी केंद्रीय पथक गावात आलं. तब्बल महिन्याभराने आलेल्या या पथकाने रात्रीच्या अंधारातच पाहणी केली. कर्मचाऱ्यांकडे असलेल्या टॉर्चच्या प्रकाशात या पथकाला नेमकं काय दिसलं असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला. त्यावरुन त्यांनी नाराजी आणि संतापही व्यक्त केला.
Solapur Flood Central Team Night Inspection : शेतकऱ्यांचं ऐकूनही घेतलं नाही
या संबंधी एका शेतकऱ्याने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचे काय हाल झालेत याकडे सरकारचे लक्ष नाही. गाडीतून ते उतरायला तयार नव्हते, रात्रीच्या अंधारातच पाहणी केली. कुणाचा ऊस किती गेला, कांदे गेले, शेती खरडून गेली याची काहीही माहिती घेतली नाही. त्यांना नीट मराठीही बोलता येत नव्हतं. आपापसात त्यांनी चर्चा केली. पण शेतकऱ्यांशी बोलण्याची त्यांची मानसिकताही नव्हती, त्यांनी शेतकऱ्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही.
ग्रामस्थ जे मुद्दे मांडत होते ते त्यांनी ऐकूनही घेतलं नाही. त्यांनी फक्त माना हलवण्याचं काम केलं. काहीतरी मदत करतो असं आश्वासनही त्यांनी दिलं नाही असं एका शेतकऱ्याने म्हटलं.
ही बातमी वाचा:



















