एक्स्प्लोर
Shah rukh Khan 'King' Teaser Reveal : वाढदिवसानिमित्त शाहरुखनं चाहत्यांना दिलं खास गिफ्ट, 'किंग'चा फर्स्ट लूक पाहून चाहते खुश!
Shah rukh Khan 'King' Teaser Reveal : शाहरुख खानने 60 व्या वाढदिवशी आपल्या आगामी अॅक्शनपट ‘किंग’चा दमदार टीझर रिलीज करून चाहत्यांना खास भेट दिली.
Shah rukh Khan 'King' Teaser Reveal
1/9

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आज आपला 60 वाढदिवस साजरा करतोय. या खास दिवशी शाहरुखने त्याच्या चाहत्यांना गोड गिफ्ट दिलं आहे.
2/9

शाहरुखने आपल्या वाढदिनी त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केला. बऱ्याच काळानंतर शाहरुख नव्या लूकमध्ये दिसला आहे.
3/9

शाहरुख खानच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सुपरस्टारने आपल्या 'किंग' चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केला आहे.
4/9

शाहरुख खानने 60 व्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट दिली. हे पाहून सगळे चाहते खुश झाले. तब्बल तीन वर्षांनंतर शाहरुख पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
5/9

शाहरुख खानचा 'किंग' चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. ते फक्त पोस्टरची वाट पाहत होते. आता अखेर 'किंग'चा पहिला टीझर आला आहे.
6/9

टीझरमध्ये शाहरुखचा आवाज ऐकू येतोय. त्यात शाहरुख म्हणतोय, "मी किती खून केले ते आठवत नाही. कोण चांगलं, कोण वाईट मी कधी विचारलं नाही. म्हणूनच सगळे मला ‘किंग’ म्हणतात."
7/9

शाहरुख खानच्या चित्रपटाचा टीझर अॅक्शनने भरलेला आहे. प्रत्येक फ्रेम जबरदस्त अॅक्शन दाखवते. शाहरुखचा लूकही खूप जबरदस्त आहे. 'किंग' हा चित्रपट 2026 मध्ये रिलीज होणार असून, या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे.
8/9

शाहरुख खानचा 'किंग' चित्रपट चर्चेत आहे. यात अभिषेक बच्चन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, दीपिका पदुकोण आणि राणी मुखर्जी यांसारखे कलाकार आहेत.
9/9

यात अभय वर्मा आणि राघव जुयालसारखे नवे कलाकारही आहेत. शाहरुखची मुलगी सुहाना खानही या चित्रपटात आहे आणि ती मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
Published at : 02 Nov 2025 02:35 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















