एक्स्प्लोर
Shah Rukh Khan : हॅप्पी बर्थडे 'किंग खान'! मन्नतबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी, पाहा PHOTOS
Shah Rukh Khan : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आज 60 वर्षांचा झाला असून चाहत्यांनी त्याचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी.
Shah Rukh Khan
1/9

बॉलीवूडचा सुपरस्टार 'किंग खान' अर्थात शारुख खानचा आज 60 वा वाढदिवस आहे.
2/9

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाने त्याच्या चाहत्यांनी मन्नतबाहेर तुफान गर्दी केली होती. किंग खानची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोक जमले होते.
3/9

दरवर्षी प्रमाणे हा दिवस त्याच्या लाखो चाहत्यांसाठी एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नसतो. 'मन्नत' मध्ये सध्या बांधकाम सुरु असल्या कारणाने या वेळी मात्र शाहरुख खान बाल्कनीत आला नाही.
4/9

पण त्या व्यतिरिक्त यावर्षी किंग खानने आपला वाढदिवस अलिबागमधील फार्महाऊसवर साजरा केला.
5/9

सतत वाढणारी गर्दी आणि ट्रॅफिकच्या समस्येमुळे मुंबई पोलिसांनी कठोर पाऊल उचलले. चाहत्यांना ‘मन्नत’ च्या गेटजवळ उभं राहण्याची परवानगी देण्यात आली नाही.
6/9

जसे चाहते जमा होऊ लागले तसे पोलिसांनी त्यांना लगेच हटवले. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या लाडक्या हिरोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फॅन्स रस्त्यावर देखील उतरले.
7/9

सगळीकडे फक्त एकच आवाज घुमत होता, “हॅप्पी बर्थडे शाहरुख!”. काही चाहते उत्साहात फिल्मी अंदाजात 'बार बार दिन ये आए' गात होते.
8/9

पोलिसांच्या कडक कारवाईमुळे काही चाहते निराश झाले. साठ वर्षांचा शाहरुख आजही देश-विदेशातील लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतात.
9/9

आज शाहरुख खानच्या खास वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. हॅप्पी बर्थडे शाहरुख खान, तुमचं आयुष्य आनंदी आणि यशस्वी राहो.
Published at : 02 Nov 2025 02:15 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















