मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
वर्ल्ड टेस्ट चँपियनशीप 2025-27 साठी टीम इंडियाची ही तिसरी कसोटी मालिका असणार आहे. बीसीसीआयकडून प्रेसनोट जारी करत शुभमन गिलच्या नेतृत्वात प्लेईंग इलेव्हससह 15 जणांचा संघ जाहीर केला आहे.

एकीकडे महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकत टीम इंडियाचा (Team india) जगात दबदबा निर्माण केला असता, दुसरीकडे बीसीसीआयने (BCCI) कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतचं (Rishabh pant) या दौऱ्याच्या निमित्ताने पुनरागमन झालं असून त्याच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ऋषभ पंतला फलंदाज, यष्टीरक्षक आणि उपकर्णधार अशा तिहेरी भूमिकेत मैदानावर दिसून येईल.
वर्ल्ड टेस्ट चँपियनशीप 2025-27 साठी टीम इंडियाची ही तिसरी कसोटी मालिका असणार आहे. बीसीसीआयकडून प्रेसनोट जारी करत शुभमन गिलच्या नेतृत्वात प्लेईंग इलेव्हससह 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. टीम इंडियासह बीसीसीआय बोर्डाने दक्षिण आफ्रीका 'अ' विरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया 'अ' चीही घोषणा केली. त्यासाठी, तिलक वर्माकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.
ऋषभ पंतसह या खेळाडूची टीम इंडियात वापसी
ऋषभ पंतला इंग्लंड दौऱ्यातील चौथ्या कसोटी सामन्यात जखम झाली होती, त्यामध्ये पंतच्या पायाचे बोट फ्रँक्चर झाले होते. त्यामुळे, आशिया कप, वेस्टइंडीज टेस्ट सीरीज आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनही ऋषभ पंत बाहेर होता. 100 पेक्षा अधिक दिवसांनंतर आता टीम इंडियात पंतची वापसी होत असून चाहत्यांकडून स्वागत होत आहे. पंतसह टीममध्ये आकाश दीपचीही वापसी झाली आहे. पंतच्या सहभागामुले एन. जगदीसनला संघातून बाहेर बसावलं लागलं आहे. तर, जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आकाश दीप संघात आला आहे.
भारताचा कसोटी संघ :
भारताचा कसोटी संघ : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेट कीपर) आणि (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार, मोहम्मद अकुंल रेड्डी, दीपकुमार अकुंल, दीपकुमार रेड्डी.
हेही वाचा
हॅप्पी बर्थडे 'किंग कोहली’, जाणून घ्या कसा होता विराटचा प्रवास!
















