एक्स्प्लोर

गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित या सामंजस करारावर स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी स्वाक्षरी केली.

मुंबई : जगविख्यात उद्योजक इलॉन मस्क (Elon musk) यांची कंपनी असलेल्या स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) सोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे. स्टारलिंक आणि महाराष्ट्र शासनाचे माहिती तंत्रज्ञान विभागसमवेत सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे, राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट (internet_ सेवा पोहोचविण्याची दिशा वाटचाल होत असल्याचा असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाचे माहिती तंत्रज्ञान विभागसमवेत सामंजस्य करार प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मात्र, केंद्राच्या दूरसंचार विभागाकडून स्टारलिंक कंपनीला आवश्यक नियामक आणि अनुपालन परवानग्या मिळाल्यानंतरच ते अंमलात येणार असल्याची माहिती देखील राज्य सरकारने दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित या सामंजस करारावर स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी स्वाक्षरी केली. या करारानंतर स्टारलिंकसोबत औपचारिक भागीदारी करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. स्टारलिंक महाराष्ट्राशी भागीदारी करत असल्याने आपण राज्यातील शेवटच्या गावापर्यंत डिजिटल दरी मिटवत आहोत. प्रत्येक शाळा, प्रत्येक आरोग्य केंद्र आणि प्रत्येक गाव आता डिजिटल संपर्कात येणार आहे, कितीही दुर्गम असो ही भागीदारी ‘फ्युचर-रेडी’ आणि पूर्णपणे जोडलेले महाराष्ट्र घडविण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. भारतातील पहिले राज्य म्हणून ही भागीदारी सुरू करताना अभिमान वाटत आहे. हे ‘डिजिटल इंडिया’च्या ग्रामीण पातळीवरील आदर्श मॉडेल ठरेल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आमचे ध्येय म्हणजे कुठेही, कोणत्याही पार्श्वभूमीतील लोकांना उच्च गतीची इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणे. त्यामुळे महाराष्ट्र शासनासोबत या ऐतिहासिक सहकार्याचा भाग होणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. स्टारलिंकचे ध्येय म्हणजे पारंपरिक पायाभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या लोकांना डिजिटल विश्वात सामील करणे. महाराष्ट्राचे समावेशक आणि लवचिक डिजिटल विकासाचे दृष्टीकोन आमच्याशी पूर्णपणे सुसंगत आहे. एकत्र येऊन आपण उपग्रह इंटरनेटद्वारे शिक्षण, आरोग्य सेवा आणि ग्रामीण समुदायांना सक्षम बनविण्याचे उदाहरण घालू असे स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर यांनी सांगितले.

ग्रामीण महाराष्ट्रात गतीमान इंटरनेट पोहोचणार

या माध्यमातून शासन संस्था, ग्रामीण समुदाय तसेच महत्त्वाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी उपग्रहाधारित इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही भागीदारी भारत सरकारकडून मिळणाऱ्या नियामक व कायदेशीर मंजुरींवर आधारित असणार आहे. या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महाराष्ट्र शासन आणि स्टारलिंक मिळून राज्यातील दुर्गम व अल्पसेवित भागांना जोडण्यासाठी कार्य करतील. यात आदिवासी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आपत्ती नियंत्रण कक्ष, वन चौक्या, किनारी क्षेत्रे, तसेच गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. या उपक्रमाचा उद्देश राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा मार्गांवरही (जसे की समृद्धी महामार्ग, फेरी सेवा, बंदरे, किनारी पोलीस नेटवर्क) उपग्रहाधारित कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे आहे. तसेच शिक्षण आणि टेलिमेडिसिन क्षेत्रातही स्मार्ट कनेक्टिव्हिटीचा लाभ देण्याची योजना आहे. या उपक्रमासाठी एक संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे. या कार्यगटाद्वारे 90 दिवसांचा प्रायोगिक टप्पा अंतर्गत तीन टप्प्यांमध्ये — 30, 60 आणि 90 दिवस यानुसार पूर्ण केला जाईल. या प्रगतीचा आढावा दर तिमाहीला मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेतला जाणार आहे. महाराष्ट्र-स्टारलिंक सहकार्यामुळे राज्याच्या ‘डिजिटल महाराष्ट्र’ या प्रमुख मिशनला अधिक गती मिळणार असून, हे उपक्रम राज्यातील ईव्ही, किनारी विकास आणि आपत्ती प्रतिकारशक्ती कार्यक्रमांशी सुसंगतपणे एकत्रित केले जाणार आहे.

प्रायोगिक टप्प्यातील मुख्य उद्दिष्टे :

शासन व आदिवासी शाळा, आपले सरकार केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपग्रह इंटरनेट जोडणी प्रदान करणे
आपत्ती प्रतिसाद आणि किनारी सुरक्षा व्यवस्थेतील संवाद सुधारणा
शिक्षण व आरोग्यसेवेसाठी उच्च-गती इंटरनेटद्वारे सुविधा उपलब्ध करून देणे
राज्य यंत्रणा आणि स्थानिक समुदायांसाठी प्रशिक्षण व क्षमता-विकास कार्यक्रम राबविणे.
प्रायोगिक टप्पा पूर्ण झाल्यानंतर हा उपक्रम संपूर्ण राज्यभर विस्तारला जाईल, ज्यामुळे महाराष्ट्र उपग्रहाधारित डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये राष्ट्रीय आघाडीवर पोहोचेल.

स्टारलिंकविषयी माहिती

स्टारलिंक ही जगातील सर्वाधिक प्रगत लो-अर्थ ऑर्बिट उपग्रहसंस्था आहे, जी विश्वासार्ह आणि उच्च-गतीचा ब्रॉडबँड इंटरनेट पुरवते. हे नेटवर्क स्पेसएक्स या कंपनीद्वारे विकसित व संचालित केले जाते. स्पेसएक्स ही जगातील अग्रगण्य लॉन्च सेवा पुरवठादार असून, पुनर्वापर करता येणाऱ्या रॉकेट तंत्रज्ञानाची मालकी असलेली एकमेव कंपनी आहे.

हेही वाचा

राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती होणार की नाही? बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ठरलं, वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
Rohit Pawar : अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar on Election Commission : निवडणूक आयोग म्हणजे BJP ची एक्स्ट्रा बॉडी
Rohit Pawar on Jay Pawar : जय पवार निवडणूक लढवणार? बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार?
Rohit Pawar on MNS : मनसेला मविआत घेण्याबाबत शरद पवारांचं मत काय?
Pawar Politics: 'भाजपसोबत जाऊ नका', Sharad Pawar यांचा आदेश; Ajit Pawar गटासोबत युतीचे संकेत?
Rohit Pawar EXCLUSIVE : स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? रोहित पवारांचे मोठे वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
Rohit Pawar : अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती होणार की नाही? बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ठरलं, वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय
राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती होणार की नाही? बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ठरलं, वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Tata Nexon की Maruti Brezza रोजच्या प्रवासासाठी कोणती कार अधिक फायदेशीर?
Tata Nexon की Maruti Brezza रोजच्या प्रवासासाठी कोणती कार अधिक फायदेशीर?
BJP on Rahul Gandhi: राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा 'ब्राझील कारनामा' समोर आणताच भाजपचा संताप; परदेशातून प्रेरणा मिळत असल्याचा केला आरोप
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा 'ब्राझील कारनामा' समोर आणताच भाजपचा संताप; परदेशातून प्रेरणा मिळत असल्याचा केला आरोप
Embed widget