दादा की ट्रॉली देखो!
लाईव्ह करून झाले, इन्स्टा वापरून झालं.. बागकाम करून झालं.. घराची सफाई झाली.. आता पुढे काय.. तर आता चॅलेंज आहे दादा की ट्रॉलीचं. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने हे चॅलेंज सुरू केलं आहे. चला बघूया तरी हे चॅलेंज आहे तरी काय..
मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे सगळे घरी आहेत. आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहेच. त्यामुळे घरी बसून काय करायंच असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. कलाकारांचंही असंच झालं आहे. म्हणजे फूड रेसिपी करून झाल्या.. लाईव्ह करून झाले, इन्स्टा वापरून झालं.. बागकाम करून झालं.. घराची सफाई झाली.. आता पुढे काय.. तर आता चॅलेंज आहे दादा की ट्रॉलीचं. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने हे चॅलेंज सुरू केलं आहे. चला बघूया तरी हे चॅलेंज आहे तरी काय..
तुम्ही तेजस्विनी पंडित आणि सिद्धार्थ जाधवच्या इन्स्टा अकाऊंटवर गेलात तर तुम्हाला दादा कि ट्रॉली म्हणजे काय ते कळेल. समजावून सांगायला गोष्ट साधी सोपी आहे. फॅनला तुमचा मोबाईल बांधायचा.. फॅनच्या खाली तुम्ही उभे राहायचं आणि फॅन सुरू करायचा. तर त्यानंतर फॅनसोबत कॅमेराही फिरू लागेल. अशावेळी त्या कॅमेऱ्यात बघून बोलण्याचा प्रयत्न करयाचा... त्यानंतर जे दिसतं ती असते दादा कि ट्रॉली.
तेजस्विनी पंडितने चॅलेंज दिल्यानंतर सिद्धार्थ जाधवनेही हे चॅलेंज स्वीकारलं आणि त्या ट्रेंडला एकप्रकारे पाठिंबा दिला. याबद्दल तो म्हणाला, तेजस्विनी पंडितने सगळ्यात आधी हे चॅलेंज मला दिलं. फोन फॅनला बांधून फिरणं हे तसं सोपं नाही. कारण तो फोन नीट बांधता यायला हवा. शिवाय फॅनला बांधल्यानंतर तो कुठे लागत नाहीय ना हेही पाहिलं पाहिजे. ती काळजी घेतली तर हा प्रकार फारच इंटरेस्टिंग होता. मजा आली.
हा ट्रेंड आणणाऱ्या संजय जाधव यांच्याशी जेव्हा एबीपी माझाने संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, मी खूप सिनेमात ट्रॉली वापरली आहे. पण मला आठवतं की क्रेन यायच्या आधी मी क्रेनचा इफेक्ट कॅमेऱ्यात दिला होता. बैलगाडीच्या मागच्या बाजूला कॅमेरा लावला होता आणि पुढून बैलगाडीची गाडी खाली दाबली होती. मग मागची बाजू वर आली होती. मग त्यातूनच एक गंमत म्हणून असं करून बघावं वाटलं आणि ते चॅलेंज पुढे तेजस्विनीनं कंटिन्यू केलं.
संबंधित बातम्या :