एक्स्प्लोर

हुज्जत घालताच रितेश भाऊंच्या पारा चढला, प्राजक्तामुळे भाऊच्या धक्क्यावर वाढलं टेन्शन, घडलं काय?

एका बाजूला दोन गट स्पष्टपणे दिसत असताना, त्याच गटातील सदस्यांमध्येही मतभेद उफाळून येताना प्रेक्षकांनी पाहिले. मात्र यावेळी प्रकरण अधिकच तापले आहे.

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये वाद-विवाद आता नित्याचे झाले असले तरी यावेळी घडलेली घटना विशेष ठरली आहे. घरातील स्पर्धकांमध्ये सुरू असलेले मतभेद आता थेट ‘भाऊचा धक्का’वर पोहोचले असून एका सदस्याने होस्ट रितेश देशमुख यांच्याशीच उघडपणे वाद घातल्याचं प्रोमोमधून दिसत आहे. बिग बॉसच्या सहाव्या पर्वात सुरुवातीपासूनच गटबाजी, टोळ्या आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एका बाजूला दोन गट स्पष्टपणे दिसत असताना, त्याच गटातील सदस्यांमध्येही मतभेद उफाळून येताना प्रेक्षकांनी पाहिले. मात्र यावेळी प्रकरण अधिकच तापले आहे.

समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख घरातील एका प्रसंगाचा उल्लेख करत प्राजक्ता शुक्रेला जाब विचारताना दिसतात. त्यांच्या मते, प्रभू शांतपणे गार्डन एरियात बसले असताना मुद्दाम टोमणा मारण्यात आला. या कृतीमागचा उद्देश काय, असा सवाल रितेश यांनी उपस्थित केला. प्राजक्ताने कारण नसताना हुज्जत घातली. प्रभू यापूर्वीही अशाच प्रकारे वागत असल्याचा दावा करत तिने इतर सदस्यांना साक्षी ठेवण्याची तयारी दर्शवली. तिच्या या भूमिकेमुळे वातावरण अधिकच ताणलं गेलं.

नेमकं म्हणाले काय रितेश भाऊ?

या घरात आता नवीन सुरू झालं आहे गँगअप. हे सगळं प्रभू यांच्यासोबत केलं तुम्ही. गार्डनमध्ये ते शांत बसले होते, काहीच करत नव्हते. पण प्राजक्ता तुम्हाला असं वाटलं की प्रभू काहीतरी ऐकत आहेत आणि मग तुम्हाला एक टोमणा मारायचा होता. जा जा आत जाऊन सांग इथं काय ऐकलंस ते ..

यावर प्राजक्ताही म्हणाली, "आधी केलं आहे त्याने तसं भाऊ, आधी त्याची सवय राहिली आहे. तुम्ही सगळ्यांना विचारा सगळे हात वर करतील या गोष्टीवर" यावर रितेश भाऊही चिडतात. मी बिग बॉस पाहतो. मला कुणाला विचारायचं आहे, तुम्ही सांगायची गरज नाही. नाहीतर इथं या माझं काम करा तुम्ही", असं तो सांगतो .

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

निर्णय कसा घ्यायचा हे त्यांना माहीत असून त्यासाठी इतरांकडून मार्गदर्शनाची गरज नसल्याचं रितेश भाऊंनी तिला सुनावलं. त्यांच्या या कडक भूमिकेमुळे सेटवर काही क्षण शांतता पसरल्याचं दिसतं. आता या वादाचा पुढे काय परिणाम होणार, प्राजक्तावर काही कारवाई होणार का, आणि घरातील समीकरणं पुन्हा बदलणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. ‘भाऊचा धक्का’चा हा भाग नक्कीच चर्चेचा विषय ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Deshpande Replace From Serial: 'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
Ekta Kapoor Leases Out Juhu Property In Mumbai: एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget