एक्स्प्लोर

इस्त्रायल अमेरिकेनं सर्वोच्च धर्मगुरु खोमेनींना टार्गेट केलं असताना इराणने पहिल्यांदा 'सेफ हेवन' दुबई, अबुधाबी, कतारला भाजून का काढलं? बुर्ज खलिफा रिकामा करावा लागला, विमानतळ सुद्धा बंद!

Why Iran Attack on Dubai and Other Arab Country: इराणने अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदा अमेरिकन लष्कराला भूमी देणाऱ्या शेजारील देशांनाच टार्गेट करत मोठा हल्ला केला आहे.

Why Iran Attack on Dubai and Other Arab Country:  अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांना मारल्यानंतर इराणने आखाती देशांमधील (Gulf states) अमेरिकन तळांवर आणि इस्रायलवर हल्ले चढवले आहेत. इराणने खोमेनी यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे सांगत 27 ठिकाणांवर हल्ला चढवला आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचे सलग 37 वर्षे सत्ता गाजवणारे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि इराणच्या सशस्त्र दलाचे प्रमुख अब्दुल रहीम मौसवी मारले गेले आहेत. 

आखाती देशांमधील तळांना लक्ष्य  

राणने अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदा अमेरिकन लष्कराला भूमी देणाऱ्या शेजारील देशांनाच टार्गेट करत मोठा हल्ला केला आहे. हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने संयुक्त अरब अमिराती (दुबई), कतार (दोहा) आणि बहरीन (मनामा) मधील अमेरिकन लष्करी तळांवर आणि मालमत्तांवर आज (1 मार्च) सलग दुसऱ्या दिवशी हल्ले केले. ओमान (अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी) वगळता जवळपास सर्वच आखाती देशांमधील तळांना लक्ष्य करण्यात आले आहे.

युएई (UAE) आणि कतारमधील नुकसान

इराणने युएईवर 137 क्षेपणास्त्रे आणि 209 ड्रोन डागले, ज्यामुळे दुबईतील पाम जुमेराह, बुर्ज अल-अरब आणि जेबेल अली या महत्त्वाच्या पोर्टवर आग आणि धुराचे लोट पाहायला मिळाले. अबू धाबी विमानतळावर झालेल्या हल्ल्यात 1 जण ठार तर 7 जण जखमी झाले. तसेच, कतारच्या दिशेने 65 क्षेपणास्त्रे आणि 12 ड्रोन डागण्यात आले, ज्यामध्ये 16 जण जखमी झाले. इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) इस्रायलमधील 27 अमेरिकन तळ, इस्रायली सैन्याचे तेल अवीवमधील मुख्यालय (HaKirya) आणि तेल नोफ (Tel Nof) हवाई तळावर थेट हल्ले केले आहेत.  

इस्रायलने रविवारी इराणच्या पश्चिम आणि मध्य भागातील 30 हून अधिक लष्करी, क्षेपणास्त्र आणि हवाई संरक्षण तळांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये किमान 201 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात मीनाब (Minab) शहरातील एका मुलींच्या प्राथमिक शाळेवरील हल्ल्यात मारल्या गेलेल्या 148 जणांचा समावेश आहे. इराणने जर आणखी हल्ले केले, तर अमेरिका आतापर्यंत 'कधीही न पाहिलेल्या ताकदीने' (force that has never been seen before) इराणवर हल्ला करेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. मात्र, इराणने भीक न घालता कारवाई सुरुच ठेवली आहे. 

दुबईवर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक भूवया उंचावल्या

इराणकडून अमेरिकन तळांवर आणि इस्त्रायलवर हल्ला अभिप्रेत असला, तरी दुबईवर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक भूवया उंचावल्या आहेत. ड्रोन आल्याने बुर्ज खलिफा सुद्धा खाली करावी लागली. जागतिक पातळीवर सर्वाधिक बिझी एअरपोर्ट असलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दुबईवर हल्ला का केला, असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. 

दुबईची 'सेफ हेवन' ही ओळख पुसून टाकली 

दुबईची संपूर्ण अर्थव्यवस्था मध्यपूर्वेतील सुरक्षित बेट (Safe Oasis) या ओळखीवर उभी आहे. जगभरातील गुंतवणूकदार आणि पर्यटक तिथे सुरक्षिततेच्या खात्रीमुळे येतात. मात्र,  इराणने तिथे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागून ही ओळख पुसून टाकली आहे. "जर इराण सुरक्षित नसेल, तर या भागातील कोणतीही अर्थव्यवस्था सुरक्षित राहणार नाही" असाच संदेश इराणने देण्याचा प्रयत्न केला आहे. यूएईत अमेरिकेचे महत्त्वाचे लष्करी तळ (उदा. अल धफरा एअर बेस) आहेत. हल्ल्यांसाठी या तळांचा आणि एअरस्पेसचा (हवाई क्षेत्राचा) वापर केला गेला याचा रागही होता. दुबईवर हल्ला झाल्याने शेअर बाजार, रिअल इस्टेट आणि पर्यटनाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे यूएईवर आता अमेरिकेला इराणविरुद्ध लष्करी कारवायांसाठी जमीन देताना विचार करावा लागणार आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा 

इराणने दुबईला टप्प्यात घेत ट्रम्प यांना स्पष्ट संदेश दिला आहे.  ट्रम्प यांनी 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (Operation Epic Fury) अंतर्गत इराणमध्ये सत्तापालट (Regime Change) करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. मात्र, हे युद्ध केवळ इराणपुरते मर्यादित राहणार नाही, तर ते अमेरिकेच्या सर्व मित्रदेशांपर्यंत पोहचेल, असा संदेश इराणने देऊन टाकला आहे. जर युद्ध लांबले, तर जागतिक तेल पुरवठा आणि दुबईसारखी व्यापार केंद्रे उद्ध्वस्त होतील, ज्याचा फटका थेट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही बसेल. वैयक्तिक ट्रम्प यांचाही व्यापार दुबईत मोठ्या प्रमाणात आहे. 

ट्रम्प यांच्यावर दबाव येईल का?

दुबईत केवळ स्थानिकच नव्हे, तर जगभरातील (अमेरिकेसह) मोठ्या उद्योगपतींची अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आहे. पाम जुमेराह (Palm Jumeirah) सारख्या ठिकाणी झालेल्या आगीच्या बातम्यांमुळे या गुंतवणुकीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. हे धनाढ्य गट ट्रम्प प्रशासनावर पडद्यामागून दबाव आणू शकतात. अब्राहम अकोर्ड्स (Abraham Accords) ट्रम्प यांच्याच काळात इस्रायल आणि यूएईमध्ये शांतता करार झाला होता. दुबईवर हल्ले झाल्यामुळे हा करार धोक्यात आला आहे. ट्रम्प यांचे अनेक जवळचे समर्थक आणि देणगीदार या कराराचे समर्थक आहेत. जर हा करार अपयशी ठरला, तर ते ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे मोठे अपयश मानले जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Director Quentin Tarantino And Family Killed In Iranian Airstrike: इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
Iran vs Israel War: इराणने सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी सर्वांना बोलावलं; इस्रायल त्या बैठकीवरच मिसाईल सोडलं, टॉप लीडरशिप संपुष्टात, नेमकं काय घडलं?
इराणने सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी सर्वांना बोलावलं; इस्रायलने त्या बैठकीवरच मिसाईल सोडलं, टॉप लीडरशिप संपुष्टात, नेमकं काय घडलं?
Israel Iran War : इराणचा कडवा प्रतिकार; दुबई, दोहा अन् अबुधाबी पुन्हा स्फोटांनी हादरले; अमेरिका -इस्रायली लष्करी कारवाईला सणसणीत प्रत्युत्तर
इराणचा कडवा प्रतिकार; दुबई, दोहा अन् अबुधाबी पुन्हा स्फोटांनी हादरले; अमेरिका -इस्रायली लष्करी कारवाईला सणसणीत प्रत्युत्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
Director Quentin Tarantino And Family Killed In Iranian Airstrike: इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार; राज्यसभेबाबत दोन्ही आघाड्यांची वेट अँड वॉचची भूमिका
शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार; राज्यसभेबाबत दोन्ही आघाड्यांची वेट अँड वॉचची भूमिका
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election 2026: उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?; मुंबई महानगरपालिकेतील मनसेच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष, नेमकं काय घडलं?
उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?; मुंबई महानगरपालिकेतील मनसेच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष, नेमकं काय घडलं?
Embed widget