Ayatollah Ali Khamenei: 'आम्ही आमच्या प्रिय नेत्याच्या हौतात्म्यासह चार शक्यता गृहित धरल्या होत्या' खामेंनीचा मृत्यूनंतरही इराणचा कडवा प्रतिकार; तेल अवीव दुबई ते कुवेतपर्यंत तब्बल 27 ठिकाणांवर हल्ला
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्लाह अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच इराणचे इस्लामिक कन्सल्टेटिव्ह असेंब्लीचे अध्यक्ष कालिबाफ यांनी मोठा दावा केला आहे.

Ayatollah Ali Khamenei: अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. शनिवारी इस्रायलने खामेनी यांच्या कार्यालयावर सुमारे 30 क्षेपणास्त्रे डागली, ज्यामध्ये खामेनी आणि 40 कमांडर ठार झाले. या हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई, नात आणि सून यांचाही मृत्यू झाला. इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानसह 10 प्रमुख शहरांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 200 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि 740 हून अधिक जखमी झाले आहेत. एका शाळेवर क्षेपणास्त्र हल्ला झाला, ज्यामध्ये 148 विद्यार्थिनी मृत्युमुखी पडल्या आणि 45 जण जखमी झाले. इराणने इतर देशांवरही प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले आहेत.
आम्ही खामेनींच्या मृत्यूसह चार शक्यता गृहित धरल्या होत्या
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्लाह अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच इराणचे इस्लामिक कन्सल्टेटिव्ह असेंब्लीचे अध्यक्ष कालिबाफ यांनी मोठा दावा केला आहे. आम्ही खामेनींच्या मृत्यूसह चार शक्यता गृहित धरल्या होत्या, असे म्हटलं आहे. त्यामुळे इराण इतक्यात माघार घेणार नसल्याचे संकेत आहेत. इराणने अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेशी संबंधित 27 ठिकाणांवर हल्ला चढवला आहे. इराणने यावेळी पहिल्यांदा इस्त्रायलकडे ड्रोन, बॅलेस्टिक मिसाईल डागलेल्या नाहीत, तर त्या अमेरिकेला आणि इस्त्रायलला मदत करू शकतील अशा सर्व ठिकाणांना पहिल्यांदा टार्गेट केलं आहे. त्यामुळे इस्त्रायलवर एकहाती हल्ला करताना अडचण येऊ नये. अमेरिकेची पाच एअरबेस टार्गेट केली आहेत.
कोणत्याही घटनेसाठी तयार होतो
कालिबाफ म्हणाले की, आमच्या प्रिय नेत्याच्या हौतात्म्यासह सर्व परिस्थितींसाठी आम्ही नियोजन केले होते. आम्ही महान इमाम आणि आमच्या शहीद इमामचा मार्ग प्रामाणिकपणे चालू ठेवू. व्यक्तिवादापासून इतकी दूर गेली आहे की झिओनिस्ट राजवटीविरुद्ध इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी कारवाया कोणीही केल्या नाहीत. आम्ही सर्व परिस्थितींसाठी नियोजन केले होते आणि कोणत्याही घटनेसाठी तयार होतो.
दुसरीकडे, खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांची देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड होऊ शकते. मोजतबा खामेनी यांच्या सर्वोच्च नेते म्हणून नियुक्तीची तयारी गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती. तथापि, अद्याप याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. इराणमध्ये सर्वोच्च नेते (रहबर) निवडण्याची आणि देशाचे शासन करण्याची प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची आहे. इराण आणि व्हॅटिकन सिटी हे जगातील एकमेव असे दोन देश आहेत जिथे धार्मिक नेते सर्वात शक्तिशाली आहेत. जसे व्हॅटिकनमध्ये पोप सर्वोच्च नेते आहेत, तसेच इराणमध्ये सर्वोच्च नेते सर्वोच्च नेते आहेत. "रहबर" म्हणजे मार्गदर्शक किंवा मार्ग दाखवणारा. इराणमध्ये, 88 धर्मगुरूंची सभा सर्वोच्च नेत्याची निवड करते.
इतर महत्वाच्या बातम्या
























