एक्स्प्लोर

प्रतीक्षा संपली! रणबीर कपूरच्या ‘रामायण पार्ट 1’चा ट्रेलर येणार या दिवशी, 4000 कोटींची फिल्म धुमाकुळ घालणार?

या स्क्रीनिंगला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने चित्रपटाच्या टीमचा आत्मविश्वास वाढल्याचं सांगितलं जात आहे.

Ramayan 1 Trailer : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असणारा बहुप्रतिक्षित ‘रामायण पार्ट 1’बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित मल्होत्रा निर्मित हा भव्य चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार असून आता त्याच्या ट्रेलरच्या रिलीजबाबतही चर्चा रंगल्या आहेत.

‘रामायण’ हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा मेकर्सचा मोठा प्लॅन आहे. नुकतीच रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची खास स्क्रीनिंग अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे निवडक प्रेक्षकांसाठी करण्यात आली. या स्क्रीनिंगला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने चित्रपटाच्या टीमचा आत्मविश्वास वाढल्याचं सांगितलं जात आहे.

अमेरिकेत होणार ट्रेलर लॉन्च

मिळालेल्या माहितीनुसार, ‘रामायण पार्ट 1’चा ट्रेलर अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित सॅन डिएगो कॉमिक-कॉन फेस्टिव्हलमध्ये रिलीज करण्याची तयारी सुरू आहे. नमित मल्होत्रा यांनी या भव्य प्रोजेक्टला भारतातील सर्वात महागडा चित्रपट असल्याचं यापूर्वीच म्हटलं आहे. त्यामुळे ट्रेलरही जागतिक मंचावरून लॉन्च करण्याचा मेकर्सचा प्रयत्न आहे.

रामायण’ला केवळ भारतीय धार्मिक कथा म्हणून नव्हे तर भव्य सिनेमॅटिक अनुभव म्हणून जागतिक स्तरावर सादर करण्याचा मेकर्सचा मानस आहे. सहसा कॉमिक-कॉनसारख्या मंचावर हॉलीवूडच्या मोठ्या फ्रँचायझी चित्रपटांचे ट्रेलर आणि खास झलक दाखवल्या जातात. त्यामुळे अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर ‘रामायण’चा समावेश होणे ही स्वतःमध्ये मोठी गोष्ट मानली जात आहे.

दरम्यान, नुकतीच लॉस एंजेलिसमध्ये चित्रपटाची खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली होती. निवडक प्रेक्षकांना चित्रपटातील काही भाग दाखवण्यात आले आणि त्याला उत्स्फूर्त सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. विशेषतः चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्स, भव्य सेट डिझाइन आणि मोठ्या प्रमाणावर उभारलेले सीन्स यांची प्रेक्षकांनी मनापासून प्रशंसा केली. या सकारात्मक प्रतिसादामुळे मेकर्सचा आत्मविश्वास अधिकच वाढला असून ‘रामायण’ विविध देशांतील प्रेक्षकांनाही आकर्षित करेल, असा त्यांना विश्वास वाटू लागला आहे.

ट्रेलर कधी येणार?

कॉमिक-कॉनचे आयोजन यंदा 23 ते 26 जुलैदरम्यान होणार आहे. या कालावधीत ‘रामायण पार्ट 1’चा ट्रेलर प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्ममुळे चित्रपटाला मोठी ग्लोबल ओळख मिळेल, अशी मेकर्सची अपेक्षा आहे. दरम्यान, रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता ट्रेलर कधी समोर येतो आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती मोठा धमाका करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
Samay Raina: समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात 10 लाखांचा दंड; आता पुन्हा काय झालं?
समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात 10 लाखांचा दंड; आता पुन्हा काय झालं?
Urfi javed Slams Adnan Shaikh: 'पब्लिक प्रॉपर्टी..'प्रसिद्ध युट्यूबर विधवा अन् घटस्फोटीत महिलांबाबतीत काय म्हणाला? उर्फी जावेद का भडकली?
'पब्लिक प्रॉपर्टी..'प्रसिद्ध युट्यूबर विधवा अन् घटस्फोटीत महिलांबाबतीत काय म्हणाला? उर्फी जावेद का भडकली?

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
Embed widget