एक्स्प्लोर

Ayatollah Ali Khamenei: वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने खामेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. इराणी वृत्तसंस्था फार्सनुसार, IRGC ने म्हटले आहे की, "आम्ही एक महान नेता गमावला आहे आणि संपूर्ण राष्ट्र शोक करत आहे."

Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका-इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला. इराण माध्यमे तस्निम आणि फार्स यांनी तसेच आयआरजीसीकडून दुजोरा देण्यात आला आहे.खामेनी यांची मुलगी, जावई, नात आणि सून यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. इराणने 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक आणि सात दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. इराणी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने खामेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. इराणी वृत्तसंस्था फार्सनुसार, IRGC ने म्हटले आहे की, "आम्ही एक महान नेता गमावला आहे आणि संपूर्ण राष्ट्र शोक करत आहे."

राणी सैन्याने धोकादायक कारवाई सुरू करण्याची घोषणा केली आहे. सैन्याने म्हटले आहे की हल्ला लवकरच सुरू होईल आणि तो प्रदेशातील व्यापलेल्या प्रदेशांना आणि अमेरिकेच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करेल. यापूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला होता. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत म्हटले आहे की, इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक असलेल्या खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. हा इराणच्या लोकांसाठी तसेच अमेरिकेसाठी आणि जगभरातील देशांसाठी न्याय आहे. विशेष म्हणजे खामेनी जेव्हापासून इराणचे सर्वोच्च नेते झाले तेव्हापासून म्हणजेच जवळपास 1989 पासून अमेरकन राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायल त्यांच्या मार्गावर होती. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या 12 दिवसांच्या युद्धातही त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, इराणने दिलेल्या कडव्या प्रतिकारानंतर युद्ध थांबले होते. मात्र, यावेळी तेहरानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये खामेनी संपूर्ण कुटुंबासह मृत्यूमुखी पडले आहेत.

इराणमधील मॉडेलिंग युगात जन्मले, 11व्या वर्षी मौलवी

19 एप्रिल 1939 रोजी मशहद या इराणच्या सर्वात मोठ्या धार्मिक शहरात अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांचा जन्म सय्यद जावेद खामेनी यांच्या पोटी झाला. ते आठ भावंडांपैकी दुसरे होते. वयाच्या चौथ्या वर्षी खामेनी यांना एका मदरशात पाठवण्यात आले, जिथे त्यांना कुराण, अरबी आणि इस्लामिक शिक्षण मिळाले. त्यांनी शाह खोमेनींच्या धोरणांना विरोध केला आणि इस्लामिक राजवटीचा पुरस्कार केला. 1963 मध्ये, शाहविरुद्ध भाषण दिल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. हळूहळू, ते सरकारविरोधी चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती बनले आणि खोमेनी यांचे विश्वासू सहकारी मानले गेले.

1979 मध्ये, इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली, ज्यामुळे शाहचे सरकार उलथून पडले. खोमेनी देशात परतले आणि त्यांनी एक नवीन इस्लामिक सरकार स्थापन केले. खमेनी यांना क्रांतिकारी परिषदेत समाविष्ट करण्यात आले आणि नंतर त्यांना उपसंरक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.

1981 मध्ये, तेहरानमधील एका मशिदीत भाषण देत असताना खमेनींवर बॉम्बस्फोट झाला. त्याच वर्षी झालेल्या दुसऱ्या बॉम्बस्फोटात तत्कालीन राष्ट्रपतींचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या निवडणुकीत, खमेनी यांना प्रचंड विजय मिळाला आणि ते इराणचे तिसरे राष्ट्रपती बनले.

1989 मध्ये खोमेनी यांच्या निधनानंतर, खमेनी यांना देशाचे सर्वोच्च नेते किंवा रहबर म्हणून नियुक्त करण्यात आले. हे साध्य करण्यासाठी संविधानात सुधारणा करण्यात आली. समर्थक त्यांना इस्लामिक व्यवस्थेचे एक मजबूत रक्षक मानतात, तर टीकाकार त्यांच्यावर कठोर आणि कट्टर राजवट चालवल्याचा आरोप करतात.

इराण-इस्रायल संघर्ष

1. अणुकार्यक्रम: अमेरिकेला इराण अणुशस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. या कारणास्तव, त्यांनी इराणवर वारंवार निर्बंध लादले आहेत. इराणचा अणुकार्यक्रम केवळ वीज निर्मिती आणि वैज्ञानिक संशोधनासाठी आहे, शस्त्रे निर्मितीसाठी नाही.

2. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र समस्या: इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम अणुकरार वाटाघाटींमध्ये एक मोठा अडथळा आहे. इराण स्पष्टपणे म्हणतो की त्यांची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत आणि या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ते याला आपली "लाल रेषा" मानतात.

3. इस्रायलवरील संघर्ष: अमेरिका इस्रायलचा सर्वात मोठा समर्थक आहे. दुसरीकडे, इराण उघडपणे इस्रायलला विरोध करतो आणि प्रदेशात अस्थिरता पसरवण्याचा आरोप करतो. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढतो.

4. मध्यपूर्वेतील हस्तक्षेप: अमेरिकेचा आरोप आहे की इराण इराक, सीरिया, लेबनॉन आणि येमेन सारख्या देशांमध्ये इस्रायल समर्थक गटांना पाठिंबा देऊन आपला प्रभाव वाढवत आहे. इराणचा असा दावा आहे की तो त्याचे हितसंबंध आणि सहयोगी देशांचे रक्षण करत आहे.

5. आर्थिक निर्बंध: अमेरिकेने इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत, ज्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget