... तो मी नव्हेच; पिठाच्या पिशवीतून पैसे वाटल्याच्या अफवांबाबत आमिर खानचं स्पष्टीकरण
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आमिर खानबाबत काही अफवा पसरवण्यात येत होत्या. आता या गोष्टिंबाबात आमिर खानने ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानने सोशल मीडियावर त्याच्यासंदर्भात पसरत असलेल्या अफवांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आमिर खानने आपल्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये आमिरने त्याच्याबाबत अनेक अफवा पसरवल्या जात असल्याचं सांगितलं आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खानने ट्विटरवरून एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्याने त्याच्याविरोधात पसरवल्या जाणाऱ्या खोट्या अफवांचं खंडन केलं आहे. आमिर खानने सध्या चर्चेत असणाऱ्या सर्व गोष्टी अफवा असल्याचं सांगितलं आहे. यांदर्भात आमिर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला की, 'मी पिठाच्या पिशव्यांमध्ये पैसे टाकून पाठवणारा व्यक्ती नाही. त्यामुळे कदाचित ही बातमी खोटी किंवा अफवा आहे. किंवा कोणी रॉबिनहुड असेल, ज्याला आपल्या नावाचा खुलासा करायचा नसेल, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, लव्ह यू.'
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आमिर खानने दिल्लीमध्ये पिठाच्या पिशव्यांचे काही पॅकेट्स पाठवले असल्याची माहिती व्हायरल होत होती. तसेच या पिठाच्या पिशव्यांमध्ये 15-15 हजार रूपये लपवून पाठवले जात अलसल्याचंही सांगण्यात येत होतं. तसेच हे प्रकरण 23 एप्रिल रोजी घडल्याचं व्हायरल होणाऱ्या माहितीमध्ये सांगितलं होतं. यादरम्यानचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु, आता स्वतः आमिर खानने या वृत्ताचं खंडन केलं आहे.
दरम्यान, आमिर खान कोरोना वॉरियर्ससाठी सतत मदत करत आहेत. परंतु, आमिरला यासंदर्भात खुलासा करायचा नाही की, त्याने पीएम केअर फंड किंवा इतर संस्थांना किती आणि काय मदत केली. यासंदर्भात आमिरचं असं मत आहे की, कोणी, कोणाला किती मदत केली, ही प्रत्येकाची खासगी गोष्ट आहे. या गोष्टी सार्वजनिक करणं योग्य वाटत नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी गिव्ह इंडियाच्या वतीने एका वर्च्युअल कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्याच्या मदतीने कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी मदत गोळा करण्यात आली. या वर्च्युअल कॉन्सर्टमध्ये एंटरटेन्मेन्ट इंडस्ट्रीमधील अनेक नामांकित सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यामध्ये आमिर खान आपली पत्नी किरण रावसोबत सहभागी झाला होता. आमिर खान आपली पत्नी किरण रावसोबत गाणं गाताना दिसून आला. आमिर खानने बॉलिवूडमधील दोन सुपरहिट गाणी गायली. त्यामध्ये 'चल लेके मुझे तू नीले गगन के तले' आणि 'जीना इसी का नाम है' या गाण्यांचा समावेश होता.
संबंधित बातम्या :
बाबा एकदम ठीक, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीच्या अफवांबाबत मुलाचं ट्वीट
coronavirus | कोरोनाच्या जनजागृतीसाठी सलमानचे 'प्यार करोना' गाणे रिलीज