रणवीर सिंहची एक्झिट! 'हा' अभिनेता साकारणार नवा 'डॉन', तिसऱ्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट
Hrithik Roshan Might Lead Don 3: अभिनेता रणवीर सिंह 'डॉन 3' मधून बाहेर पडल्याचे वृत्त आहे. ह्रतिक रोशन मुख्य भूमिकेसाठी संपर्कात असल्याची चर्चा आहे.

Hrithik Roshan Might Lead Don 3: धुरंधर चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता रणवीर सिंहची (Ranveer Singh) चर्चा सातासमुद्रापार गाजली. या चित्रपटातील लूक आणि अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आलं. तो लवकरच 'डॉन 3' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. मात्र, त्याने या चित्रपटातून काढता पाय घेतला असल्याचं बोललं जात आहे. रणवीर सिंहच्या 'डॉन 3' मधील सहभागाबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, रणवीरने स्वत:हून हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर, काही रिपोर्ट्समधून त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, या सगळ्या चर्चांमध्ये आता आणखी एक नवी अफवा समोर आली आहे. रणवीर सिंहनंतर 'डॉन 3' साठी अभिनेता ह्रतिक रोशनला संपर्क साधण्यात आल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये सुरू आहे.
'डॉन 3'मध्ये ह्रतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार?
अभिनेता रणवीर सिंह 'डॉन 3' मधून बाहेर पडल्यानंतर, निर्माते मुख्य भूमिकेसाठी स्टारच्या शोधात आहेत. फिल्मफेअरच्या रिपोर्टमध्ये सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता ह्रतिक रोशन 'डॉन 3'मध्ये मुख्य भूमिकेत दिसू शकतो. 'डॉन 2'मध्ये ह्रतिक रोशनची छोटीशी पण प्रभावी भूमिका होती. त्यामुळे 'डॉन 3'मध्ये ह्रतिक रोशन मुख्य भूमिकेत झळकू शकतो. फरहान अख्तर आणि त्याची टीम काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 'डॉन 3'मध्ये ह्रतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार की नाही, याची माहिती लवकरच समोर येईल. पण ह्रतिकचे चाहते ही बातमी ऐकून 'डॉन 3'साठी प्रचंड उत्सुक झाले आहेत.
दरम्यान, चित्रपटाच्या चर्चा अद्याप सुरूवातीच्या टप्प्यात आहेत, परंतु, ह्रतिक चित्रपटाचा भाग बनतो की नाही हे पाहणं मनोरंजक असेल. निर्मात्यांना 'डॉन 3' च्या प्रमुख भूमिकेसाठी व्हेल एस्टाब्लिश आणि मजबूत पोर्टफोलिओ असलेला अभिनेता हवा आहे. 'डॉन 3' या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेला न्याय देणारा हवा. जसे शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन, ज्यांनी पूर्वी डॉनच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला. अमिताभ बच्चन अभिनीत 'डॉन ' हा चित्रपट 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर, 'डॉन 2' हा चित्रपट 2 भागांमध्ये 2006 आणि 2011 दोन भागांमध्ये प्रदर्शित झाला.
View this post on Instagram
धुरंधर चित्रपटाच्या यशानंतर रणवीर सिंह 'डॉन 3'मधून बाहेर पडल्याचे वृत्त आहे. निर्माते किंवा कलाकारांकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, विविध रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंह आता जय मेहता यांच्या प्रलय या आगामी चित्रपटावर काम करणार आहे.
























