Entertainment News Live Updates 26May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
गिरगावात उभारले जाणार 'मराठी नाट्य विश्व' नाट्यगृह
गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून 'मराठी नाट्य विश्व' (Marathi Natya Vishwa) ही नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय इमारत उभारली जाणार आहे. त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे आज करण्यात आले.
कंगणी बाबाचा स्टाईल फंडा होतोय व्हायरल
'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. या मालिकेतील देवमाणूस म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड पहिल्या पर्वात डॉक्टर अजितकुमार तर दुसऱ्या पर्वात कंगणी बाबा - नटवर सिंहच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला. किरण गायकवाड ही भूमिका अगदी चोख बजावतो आहे.
'इर्सल' चा ट्रेलर प्रदर्शित
निवडणुका आणि राजकारणातल्या साजूक मुखवट्या मागचं भयाण वास्तव दाखवणाऱ्या 'इर्सल' (Irsal) या मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर मोठ्या, उत्साहात लॉंच करण्यात आला आहे. 'इर्सल' या सिनेमाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे आणि विश्वास सुतार यांनी केले आहे. ट्रेलर लॉंच झाल्यामुळे हा सिनेमा राजकारणातील कावेबाज माणसांच्या इर्षेची धूळवड दाखवणार असल्याचे दिसून येते.
'पृथ्वीराज' सिनेमाचे नाव होणार 'सम्राट पृथ्वीराज'
खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित 'पृथ्वीराज' (Prithviraj) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा येत्या 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. करणी सेनेने या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्यानुसार यशराज फिल्म्सने करणी सेनेची मागणी मान्य केली आहे. 'पृथ्वीराज' सिनेमाचे नाव 'सम्राट पृथ्वीराज' असे ठेवण्यात येणार आहे.
नेहा आणि यशचा लवकरच होणार साखरपुडा
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत लवकरच यश-नेहाचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत यश, परी आणि नेहा तिघेही दिसून येत आहेत. साखरपुड्यादरम्यान नेहा आणि यशने पारंपारिक लूक केलेला दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
