Entertainment News Live Updates 24 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
सुमित राघवनने केलं योगी आदित्यनाथांचे कौतुक
अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghvan) नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडत असतो. एकीकडे त्याने मांडलेल्या मुद्द्यांचं कौतुकही होतं. तर दुसरीकडे त्याला ट्रोलही केलं जातं. पण असं असूनही तो नेहमी सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. नुकतेच सुमीत राघवनने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
CHYD : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येणार सेलिब्रिटी कपल
CHYD : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर या आठवड्यात प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमध्ये अनेक कलाकारांची देखील लग्न झाली. तर काही कलाकारांचा साखरपुडादेखील झाला. या सगळ्यात चर्चेत होते ते म्हणजे विराजास कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे आणि प्रेक्षकांचा लाडका राणादा आणि पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. हे दोन्ही सेलेब्रिटी कपल या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर हजेरी लावणार आहेत.
आनंद महिंद्रा यांचे ट्वीट चर्चेत; म्हणाले, 'रोहित शेट्टी, ही गाडी उडवायला तुम्हाला अणुबॉम्ब वापरावा लागेल'
भारतामधील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा(Anand Mahindra)हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. अनेक वेळा नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्सला ते रिप्लाय देतात. नुकतेच आनंद महिंद्रा यांनी एक ट्वीट केले आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
केदार शिंदेंनी शेअर केला अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ
Ankush Choudhary : केदार शिंदेचा 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केलं आहे. आता केदार शिंदेंनी अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात अंकुश शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. केदार शिंदेंनी आता अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या भूमिकेसाठी अंकुश खूप मेहनत घेत आहे. अंकुश चौधरी शाहीर साबळेंची वेशभूषा कशा प्रकारे साकारत आहे, त्यासाठी तो कोणता मेकअप करतो या गोष्टी केदार शिंदेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.
तीन हजार फुटाच्या उंचीवर हेलिकॉप्टरद्वारे जावून 'मजनू' सिनेमाचा ट्रेलर लॉंच
मजनू' (Majnu) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. सिनेसृष्टीच्या इतिहासात प्रथमचं तीन हजार फुटाच्या उंचीवर हेलिकॉप्टरद्वारे जावून 'मजनू' सिनेमातील कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी 'मजनू' सिनेमाचा ट्रेलर लॉंच केला आहे.
Dharmaveer : 'धर्मवीर' सिनेमाने दहा दिवसांत केली 18.03 कोटींची कमाई
Dharmaveer : महाराष्ट्रात सध्या 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' (Dharmaveer mukkam post thane) चित्रपटाचाच बोलबाला आहे. 13 मे रोजी हा सिनेमा तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले आहेत. आता या सिनेमाने दहा दिवसांत 18.03 कोटींची कमाई केली आहे.
'पंचायत'ची रिंकी खूपच साधीभोळी; खऱ्या आयुष्यात सान्विका मात्र बोल्ड
'पंचायत 2' (Panchayat 2) या वेबसीरिजचा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. पंचायतचा दुसरा सीझनदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या वेब सीरिजमधील सर्वच कलाकारांचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या वेब सीरिजमध्ये सरपंचांची मुलगी रिंकी उर्फ सान्विकाच्या Sanvikaa अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
पॉपस्टार जस्टिन बिबरचा आगामी लाईव्ह शो दिल्लीत होणार
कॅनडाचा प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबरच्या (Justin Bieber) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जस्टिन बिबरचा आगामी लाईव्ह शो आता भारतात होणार आहे. 18 ऑक्टोबरला जस्टिनचा लाईव्ह शो नवी दिल्लीत होणार आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडिअमध्ये हा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. जस्टिन बिबरच्या या लाईव्ह कॉन्सर्टची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Man Udu Udu Zhala : कार्तिक सोडणार सानिकाची साथ
मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट आला आहे. मालिकेत सध्या दीपूचा गंभीर अपघात झाला आहे. हा अपघात सानिकामुळे झाला असल्याचे कार्तिक आता इंद्राला मालिकेच्या आगामी भागात सांगणार आहे. सानिकाचा हट्टीपणा दीपूच्या जीवावर बेतला आहे.