Entertainment News Live Updates 21 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
‘वाजवा रे वाजवा’ कॅप्टन्सी कार्यात कोण मारणार बाजी? ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमश्चक्री सुरु...
‘बिग बॉस मराठी’ सीझन 4च्या (Bigg Boss Marathi 4) घरामध्ये काल बिग बॉसनी घरातील सदस्यांवर ‘वाजवा रे वाजवा’ कॅप्टन्सी कार्य सोपवले होते. अपूर्वा आणि तेजस्विनीमध्ये हे कार्य पार पडणार असून, कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे आज कळणार आहे. पण, दोन्ही ग्रुप मधील सदस्य भन्नाट स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग करताना दिसत आहेत. या कॅप्टनसी कार्यामध्ये कोण कोणाची वाजवणार? अपूर्वा नि तेजस्विनीमध्ये कोण कोणाला मागे टाकून बनेल घराची नवी कॅप्टन, हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
View this post on Instagram
Kantara : ‘याला म्हणतात खरा चित्रपट...’; ‘कांतारा’ पाहून इम्प्रेस झाली कंगना रनौत!
कंगना रनौतने 'कांतारा' चित्रपट पाहिल्यानंतर इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशन केले. यामध्ये तिने ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचे जोरदार कौतुक केले. अभिनेत्री म्हणाली, ‘मी आताच माझ्या कुटुंबासह कांतारा पाहून येत आहे आणि अजूनही थरथरत आहे. किती छान अनुभव होता तो... ऋषभ शेट्टी, तुला सलाम, लेखन, दिग्दर्शन, अभिनय सगळंच अविश्वसनीय! परंपरा, लोककथा, समस्या यांचा किती सुरेख मिलाफ आहे. इतकी सुंदर फोटोग्राफी, अॅक्शन... हा एक अप्रतिम चित्रपट आहे.’
Kangana Ranaut is all praise for #Kantara after watching the film in theaters.#KanganaRanaut #KantaraMovie pic.twitter.com/Qya9Ghizb3
— Kangana Ranaut Daily (@KanganaDaily) October 20, 2022
PHOTO : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे नवे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘अप्सरा आली...’
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
View this post on Instagram
बॉलिवूडच्या ‘परम सुंदरीं’ची दिवाळी पार्टी!
सध्या सगळीकडे दिवाळीचा माहोल आहे. याच माहोलात काही बॉलिवूड कालाकारांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले जाते. या दरम्यान अभिनेत्री क्रिती सेनन हिच्या घरी देखील दिवाळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडमध्ये नाव गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील हजर होती.
View this post on Instagram
Happy Birthday Kulbhushan Kharbanda : नाटकांमधून केली अभिनयाची सुरुवात, अभिनयाने बॉलिवूड विश्व गाजवलं!
कुलभूषण खरबंदा (Kulbhushan Kharbanda) हे नाव तसं बॉलिवूडसाठी नवं नाही. आज ज्येष्ठ अभिनेते कुलभूषण खरबंदा हे त्यांचा 78 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी अधिक सहाय्यक भूमिका केल्या असल्या, तरी आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रत्येक पात्रात जीव ओतला आहे. कुलभूषण खरबंदा यांनी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत काम केले आहे. याशिवाय तो पंजाबी चित्रपट सृष्टीतही सक्रिय होते. या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी वेब सीरिजमध्येही आपली जादू चालवली आहे. 'मिर्झापूर' या वेब सीरिजमध्ये त्यांनी सत्यानंद त्रिपाठी यांची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
