धुरंधरची क्रेझ कमी झाली? 32 व्या दिवशी किती कोटींची कमाई केली?
Dhurandhar Nears ₹800 Crore Mark: धुरंधर चित्रपटाने 773.75 कोटी रुपयांची कमाई केली. लवकरच 800 कोटींचा टप्पा गाठू शकणार?

Dhurandhar Crosses ₹773 Crore: रणवीर सिंहचा धुरंधर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटला. परंतु, या चित्रपटाची जादू अजून काही सरली नाही. प्रेक्षकांच्या जबरदस्त सकारात्मक प्रतिसादामुळे धुरंधर बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 800 कोटींचा टप्पा गाठला आहे. अजूनही हा चित्रपट उत्तम कामगिरी करू शकतो. दरम्यान, सोमवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? जाणून घेऊयात.
धुरंधर चित्रपटाने मोडले बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स
आदित्य धर दिग्दर्शित स्पाय थ्रिलर धुरंधर या चित्रपटाने आपल्या नावे नवे विक्रम तयार केले आहेत. प्रदर्शित झाल्याच्या एका महिन्यातच या चित्रपटाने जगभरात 12 अब्ज रूपयांचा टप्पा ओलांडला आहे . आतापर्यंत फक्त 5 भारतीय चित्रपटाने ही कामगिरी केली आहे. मुख्य म्हणजे केजीएफ चॅप्टर 2 या चित्रपटालाही मागे टाकले आहे. तसेच छावा चित्रपटाच्या नावे असलेला विक्रम देखील धुरंधर या चित्रपटाने मोडला आहे. परंतु, महिन्यानंतर या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी झाले आहे.
धुरंधर चित्रपट 800 कोटींचा टप्पा गाठू शकणार?
सॅकनिल्कच्या आकडेनवारीनुसार, धुरंधरने रिलीजच्या 32 व्या दिवशी 4.50 कोटी रूपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 773.75 कोटी रूपयांची कमाई केली आहे. दरम्यान, धुरंधर चित्रपटाच्या 32 व्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये लक्षणीय घट झाली आहे. परंतु, लवकरच हा चित्रपट 800 कोटींचा टप्पा गाठू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु, चित्रपटाच्या कमाईत झालेली मंदी पाहता, हे पूर्ण होऊ शकते की नाही, याबाबत साशंकता आहे.
धुरंधरची बॉक्स ऑफिसवर घौडदौड कायम
धुरंधरची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरू आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. त्यानं दहशतवादी टोळीच्या नेटवर्कमध्ये घुसखोरी करणाऱ्या हमजाच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंह व्यतिरिक्त या चित्रपटात अक्षय खन्ना, अर्जून रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा, अॅक्शन आणि अभिनय यांना प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक करण्यात आलं. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येईल. धुरंधर चित्रपटाचा सिक्वेल मार्च 2026 ला प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























