Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक, व्हेंटिलेटर सपोर्टवर अभिनेते; काही दिवसांपासून प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू, देओल कुटुंबीयांना सांगितलं...
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांचे चाहते, जवळचे मित्र आणि सिनेसृष्टीतील दिग्गज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत आहेत, तसेच देओल कुटुंबीयांचीही विचारपूस करताना दिसत आहेत.

Dharmendra Health Update: ज्येष्ठ बॉलिवूड (Bollywood News) अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती खालावल्यामुळे गेल्या अकरा दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती काहिशी नाजूक असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, ते उपचारांना साकारात्मक प्रतिसाद देत असल्याची माहिती त्यांची मुलगी ईशा देओल (Esha Deol) आणि पत्नी हेमा मालिनी (Hema Malini) यांनी शेअर केली आहे. धर्मेंद्र यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्याबाबत अनेक अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच या अफवा देओल कुटुंबीयांकडून फेटाळून लावल्या जात आहेत. अशातच आता मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयातून (Breach Candy Hospital) समोर आलेल्या अपडेट्समुळे चाहत्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांचे चाहते, जवळचे मित्र आणि सिनेसृष्टीतील दिग्गज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत आहेत, तसेच देओल कुटुंबीयांचीही विचारपूस करताना दिसत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, सिनेसृष्टीवर तब्बल सहा दशकांपासून आपलं अधिराज्य गाजवत असलेले बॉलिवूड दिग्गज धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण देश त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे. ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि ते व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे आणि त्यांच्या उपचारांमध्ये कोणतीही कसर सोडली जात नाही.
काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक
गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती, म्हणूनच त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यापूर्वी सनी देओलच्या टीमनं धर्मेंद्र बरे होत असल्याचं आणि उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं होतं. सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्याशी संबंधित विविध बातम्या येऊ लागल्या. त्यांच्या मृत्यूच्या अफवाही वेगानं पसरल्या, त्यानंतर त्यांची मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी यासर्व अफवांचं खंडन करत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं.
View this post on Instagram
देओल कुटुंबीयांकडून अफवा न पसरवण्याचं आवाहन
ईशा देओल यांनी धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं, तर हेमा मालिनी यांनी पसरत असलेल्या वेगवेगळ्या अफवांवर दुःख व्यक्त केलं आणि त्यांना अनादरपूर्ण आणि बेजबाबदार म्हटलंय. हेमा मालिनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या बातम्यांवर संताप व्यक्त केला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, "जे घडत आहे, ते अक्षम्य आहे. जबाबदार चॅनेल उपचार घेत असलेल्या आणि बरं होणाऱ्या माणसाबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करा..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























