Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
Dharmendra Net Worth: धर्मेंद्र यांनी आपल्या मागे कुटुंबासाठी मोठी संपत्ती सोडली आहे. धर्मेंद्र यांनी 300 चित्रपटांच्या कारकिर्दीत 335 कोटींचं साम्राज्य निर्माण केलंय.

Dharmendra Net Worth: बॉलिवूडचे (Bollywood News) दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुपेरी पडद्यावरच्या या प्रतिभावान अभिनेत्या तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य केलं. येत्या 25 डिसेंबरला त्यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस' रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा ही-मॅन (He-man) इमोशनल अंदाजात दिसणार आहे. ज्यावेळी धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला, त्यावेळी चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आलेला.
धर्मेंद्र यांनी 1960 च्या दशकापासूनच बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला. त्यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या सिनेमातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि अजूनही ते इंडस्ट्रीत काम करतायत. अशातच जाणून घेऊयात धर्मेंद्र यांच्या नेटवर्थबाबत...
धर्मेंद्र कोट्यधीश आहेत. धर्मेंद्र यांनी 300 चित्रपटांच्या कारकिर्दीत 335 कोटींचं साम्राज्य निर्माण केलंय. त्यांनी इतर क्षेत्रातही मोठी गुंतवणूक केलेली. धर्मेंद्र यांनी 'गरम धरम ढाबा' या नावानं आपला रेस्टॉरंट व्यवसाय सुरू केलाय. त्यांनी कर्नाल हायवेवर 'ही-मॅन' नावाचं आणखी एक रेस्टॉरंट उघडलंय.
धर्मेंद्र यांची महाराष्ट्रातही मोठी गुंतवणूक
धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. ते त्यांच्याबाबतचे अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्यांनी 100 एकरमध्ये बांधलेल्या त्यांच्या फार्महाऊसची झलक शेअर केलेली. धर्मेंद्र यांचं फार्महाऊस लोणावळ्यामध्ये आहे. ज्यामध्ये स्विमिंग पूलपासून अगदी अॅक्वा थेरपीपर्यंत सर्वकाही आहे. याव्यतिरिक्त धर्मेंद्र यांच्याकडे तब्बल 17 कोटींची प्रॉपर्टी महाराष्ट्रभरात आहे.
धर्मेंद्र यांनी महाराष्ट्रात शेती आणि बिगरशेती जमिनीतही गुंतवणूक केली आहे, ज्याची किंमत अनुक्रमे 88 लाख रुपये आणि 52 लाखांपेक्षा जास्त आहे. 2015 च्या इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, त्यांनी लोणावळा येथील त्यांच्या फार्महाऊसजवळ 12 एकरच्या जागेवर 30 कॉटेज असलेलं रिसॉर्ट बांधण्यासाठी एका रेस्टॉरंट कंपनीसोबत भागीदारी केली आहे.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या 6 दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2012 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 'फूल और पत्थर', 'सीता और गीता', 'शोले', 'धरमवीर', 'आंखे', 'राजा जानी',," 'गुलामी', 'प्रतिज्ञा', 'नये जमाना', ' बर्निंग ट्रेन' आणि 'यादों की बारात' यासह अनेक हिट चित्रपट दिले. या चित्रपटांनी त्यांना केवळ एक प्रतिभावान अभिनेता म्हणून स्थापित केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























