एक्स्प्लोर
'करोडपती'वरही कोरोना! इंडियाज बेस्ट डान्सर्सच्या सेटवरही रुग्ण
चित्रिकरणाला परवानगी दिल्यानंतर ज्याची भीती होती तेच घडलं आहे. अनेक सेटवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हिंदी मालिकांच्या आणि रिअॅलिटी शोजच्या सेटवरही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत.
!['करोडपती'वरही कोरोना! इंडियाज बेस्ट डान्सर्सच्या सेटवरही रुग्ण Corona Positive Cases at Kaun banega Crorepati India's Best Dancer Sets 'करोडपती'वरही कोरोना! इंडियाज बेस्ट डान्सर्सच्या सेटवरही रुग्ण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/03192658/WhatsApp-Image-2020-09-03-at-1.56.36-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : चित्रिकरणाला परवानगी दिल्यानंतर ज्याची भीती होती तेच घडलं आहे. अनेक सेटवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एकीकडे मराठीमध्ये सुबोध भावे, अजित परब, रोहित राऊत, अभिजीत केळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे हिंदी मालिकांच्या आणि रिअॅलिटी शोजच्या सेटवरही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. सध्या कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर दोन जणांना कोरोनाचं निदान झालं आहे. तर इंडियाज बेस्ट डान्सर्सच्या सेटवर सात लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढला आहे. चित्रिकरणाला नियम अटींसह परवानगी दिली असली तरी त्यात धोका वाढतानाच दिसतो आहे. सध्या कौन बनेगा करोडपतीचा सेट दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये आहे. तिथल्या दोन क्रू मेंम्बर्सना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. संपूर्ण सेट तातडीने सॅनिटाईज करण्यात आला आहे. या दोघांना क्वारंटाईन कऱण्यात आलं असून त्यांच्या संपर्का नक्की कोण कोण आलं याचा शोध घेणं सुरू आहे.
Exclusive | कुटुंबियांना सुशांतच्या डिप्रेशनबाबत आधीपासूनच कल्पना होती; मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबातून खुलासा
तर मलाईका अरोरा, गीता कपूर, टेरेंस लुईस यांच्या इंडियाज बेस्ट डान्सर्सच्या सेटवरही कोरोनाने शिरकाव केला आहे. या सेटवर सात लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या शोमध्ये अनेक ग्रुप सहभागी होतात. त्यामुळे या सेटवर जरा चिंतेचं वातावरण आहे. दुसरीकडे स्वराज्यजननी जिजामाता या मराठी मालिकेच्या सेटवरही दोन क्रूमेम्बर्सना कोरोनाचं निदान झालं आहे. इतर कुणाला मात्र कोरोना नाहीय. तर सिंगिग स्टारच्या सेटवर कोरोना आल्यानंतर त्यांनी 10 तारखेपर्यंत चित्रिकरण थांबवलं आहे. त्यानंतर पुन्हा हे चित्रिकरण सुरू होईल.
बिग बॉससाठी सलमानने घेतले 250 कोटी! एका एपिसोडसाठी सव्वादहा कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)