![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बिग बॉससाठी सलमानने घेतले 250 कोटी! एका एपिसोडसाठी सव्वादहा कोटी
सलमान खान हा या निमित्ताने सर्वाधिक मानधन घेणारा छोट्या पडद्यावरचा कलाकार ठरला आहे.
![बिग बॉससाठी सलमानने घेतले 250 कोटी! एका एपिसोडसाठी सव्वादहा कोटी Salman khan takes Rs 250 crore for Bigg Boss 14 बिग बॉससाठी सलमानने घेतले 250 कोटी! एका एपिसोडसाठी सव्वादहा कोटी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/17082220/Bigg-Boss-12-Salman-Khan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर सलमान खानचं नाव सातत्याने चर्चेत आहे. पण याचा सलमानला काहीच फरक पडलेला नाही. कारण सलमानची किंमत वधारतेच आहे. बिग बॉसच्या 14 व्या सीझनची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या सीझनसाठी सलमान खानने तब्बल 250 कोटी रुपयांचं मानधन घेतलं असल्याची बातमी आहे.
सलमान खान हा या निमित्ताने सर्वाधिक मानधन घेणारा छोट्या पडद्यावरचा कलाकार ठरला आहे. सलमान खानने बिग बॉसच्या 14 व्या सीझनची जबाबदारी घ्यावी म्हणून अनेक दिवस प्रयत्न चालू होते. अखेर सलमानने त्याला होकार दिला आहे पण तब्बल 250 कोटी रुपये मानधन घेऊन. बिग बॉससाठी सलमान आठवड्यातून एकदा शूट करतो. या एका दिवशी फक्त दोन एपिसोड शूट होतात. असे 12 आठवडे सलमान शूट करणार आहे. या 12 आठवड्यांसाठी सलमानला 250 कोटी रूपये देण्यात येणार आहेत. म्हणजे आठवड्याला 20 कोटी 50 लाख रूपये. म्हणजे एका एपिसोडचे 10 कोटी 25 लाख रुपये इतकं हे मानधन होतं.
सप्टेंबरपासून या शोला सुरूवात होणार होती. पण अद्याप फिल्मसिटीमध्ये याचं घर बांधणं चालू आहे. आधीच आलेला लॉकडाऊन आणि त्यानंतर आलेला पाऊस यामुळे या घर बांधणीत अडचण होते आहे. पण ऑक्टोबरपासून या शोला सुरूवात होईल असं बोललं जातं.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)