एक्स्प्लोर
सिक्सरकिंग युवराज सिंगच्या लग्नाचा मुहूर्त निश्चित
मुंबई : टीम इंडियाचा सिक्सर किंग, स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेझल कीच काही महिन्यांपासून डेट करत होते. दोघांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असून येत्या डिसेंबरमध्ये युवराजच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत.
'मी आयुष्यात फार कठीण काळ पाहिला आहे. मात्र आयुष्यात एका टप्प्यावर तुम्हाला सेटल व्हावंच लागतं. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मला लग्न करायचं आहे, आणि माझ्या मते ही योग्य वेळ आहे.' असं युवराज म्हणतो.
युवराज आणि हेझलने बालीमध्ये छोटेखानी सोहळ्यात साखरपुडा केला होता, मात्र भारतात भव्य विवाहसोहळा व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. 'लग्नसमारंभ आपल्याला सगळ्यांसोबत साजरा करायचा असतो. तीन ते चार तासांचा सोहळा आखण्याचा आमचा विचार आहे. माझ्या सगळ्या क्रिकेटर मित्रांना मला आमंत्रित करायचं आहे. त्यामुळे तयारी जोरदार सुरु आहे.' असं युवराजने अत्यंत उत्साहात सांगितलं.
शीख आणि हिंदू पद्धतीने हा विवाह पार पडेल. हेझलची आई उत्तर प्रदेशातील असल्याने त्यांच्या पद्धतीनेही काही रितीरिवाज होतील. दिल्ली आणि चंदीगडमध्ये काही कार्यक्रम होतील. मुंबईत सध्या कोणत्याच इव्हेंटचं आयोजन झालेलं नाही.
'हनिमूनला कुठे जायचं, हे विचार करायलाही वेळ मिळालेला नाही. गेल्या काही महिन्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे काही दिवसांनी विचार करेन' असं युवराज म्हणतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement