Liger Trailer Launch: ‘लायगर’च्या ट्रेलर लाँचला विजय देवरकोंडाने का परिधान केली चप्पल? समोर आलं कारण...
Liger Trailer Launch: नुकताच ‘लायगर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलर लाँचच्या वेळी अभिनेता विजय देवरकोंडा चक्क चप्पल परिधान करून आला होता.
![Liger Trailer Launch: ‘लायगर’च्या ट्रेलर लाँचला विजय देवरकोंडाने का परिधान केली चप्पल? समोर आलं कारण... Why Vijay Deverakonda wears Slippers at trailer launch event here is the reason Liger Trailer Launch: ‘लायगर’च्या ट्रेलर लाँचला विजय देवरकोंडाने का परिधान केली चप्पल? समोर आलं कारण...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/23/64bdc44ffa0d96fdc450249c83a4d0191658546264_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vijay Deverakonda : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्या आगामी ‘लायगर’ (Liger) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या लाँचिंग सोहळ्यात चित्रपटाचा मुख्य अभिनेता विजय देवरकोंडा चक्क 200 रुपयांहून कमी किंमतीची चप्पल परिधान करून पोहोचला होता. यावेळी चाहत्यांनी विजयच्या साध्या शैलीचे कौतुक केले. मात्र, इतक्या स्टायलिश अभिनेत्याने या लाँचिंग सोहळ्यात साधी चप्पल का परिधान केली असावी, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. आता याचे कारण समोर आले आहे.
अभिनेत्याने साधी चप्पल का परिधान केली याचं उत्तर त्याची स्टायलिस्ट हरमन कौर हिने दिलं आहे. ‘लायगर’च्या ट्रेलरचे प्रमोशन करण्यापूर्वी विजय ट्रेलर लाँचसाठी अनन्या पांडेसोबत हैदराबादमध्ये होता. अभिनेता रणवीर सिंहने मुंबई इव्हेंटमध्ये विजयच्या लूकवर कमेंटही केली होती. यावेळी रणवीर सिंहने त्याच्या चप्पलवर देखील कमेंट केली होती.
‘हे’ आहे कारण
याबद्दल बोलताना हरमन म्हणाला की, विजयला या इव्हेंटसाठी तयार करण्यासाठी अनेक ब्रँड आणि डिझायनर त्याच्याशी सतत संपर्क साधत होते. तिने पिंकविलाशी बोलताना सांगितले की, ‘विजयचा कॉल येईपर्यंत मी हा लूक फुल ऑन स्टायलिश करण्यासाठी सज्ज होते. मात्र, त्याचा फोन आला आणि त्याने सांगितले की, त्याला हा लूक साधा आणि चित्रपटातील व्यक्तिरेखेशी मिळताजुळता ठेवायचा आहे. यावेळी त्याने स्वतः सध्या चपलांची मागणी केली. मला आधी जरा विचित्र वाटले. पण, त्याच्या कल्पनांवर मला विश्वास आहे. त्याच्या कल्पना नेहमीच लोकप्रिय होतात.’
‘लायगर’ प्रदर्शनापूर्वीच चर्चेत
लायगर चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरनं केली आहे. 'लायगर' हा चित्रपट 25 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी 'लायगर' या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'अकडी पकडी' हे गाणं रिलीज झालं.
‘लायगर’चे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. या पोस्टरला अनेकांची पसंती मिळाली. समंथा रुथ प्रभूपासून ते जान्हवी कपूर, सारा अली खान, रश्मिका मंदाना, अनुष्का शेट्टी, पूजा हेगडे आणि अनन्या पांडे या भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींनी या पोस्टरचे कौतुक केले आहे. या पोस्टरने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वात जलद गतीने 1 दशलक्ष लाईक्स गाठणारे हे पहिले भारतीय चित्रपट पोस्टर बनले आहे. या पोस्टरने अवघ्या 4 तासांत हा विक्रम केला आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)