Vishal Nikam : "पुन्हा इथे येण्यास..."; 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर विशाल निकमची खास पोस्ट
Vishal Nikam : विशाल निकम नुकताच 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून सहभागी झाला होता.
Vishal Nikam : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावं यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यात तिसऱ्या पर्वातील काही स्पर्धक वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून सहभागी झाले होते. यात बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकमचादेखील (Vishal Nikam) सहभाग होता.
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर विशाल निकमने एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलं आहे,"हक्काच्या घरी नवीन लोकांसोबत नवीन खेळ खेळायला जबरदस्त मज्जा आली. तिसऱ्या पर्वाचे 100 आणि चौथ्या पर्वाचे सात असा 107 दिवसांचा प्रवास केला आहे. पुन्हा इथे येण्यास तयार असेन नक्कीच".
विशाल निकम हा 'बिग बॉस'च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता होता. त्याचा खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. आता पुन्हा एकदा वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून त्याने 'बिग बॉस'च्या घरात धमाका केला. सातही दिवस त्याने प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं.
View this post on Instagram
महेश मांजरेकरांनी रविवारी 'बिग बॉस'च्या चावडीमध्ये घरातील सदस्यांना मोठा धक्का दिला. दोन वाईल्ड कार्ड स्पर्धकांना त्यांनी घरातून बाहेर येण्यास सांगितले. यात विशाल निकम आणि मीरा जगतापचा समावेश होता. विशाल पुन्हा बिग बॉसच्या घरात गेल्याने त्याचे चाहते आनंदी झाले होते. पण आता तो पुन्हा बाहेर पडल्याने ते नाराज झाले आहेत.
'बिग बॉस मराठी' टीआरपीच्या शर्यतीत मागे पडल्याने चॅनल वेगवेगळ्या उपक्रमांचा अवलंब करत आहे. मागील पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने त्या पर्वातील स्पर्धकांना या पर्वात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून घेण्यात आले. पण तरीही टीआरपीच्या शर्यतीत हा कार्यक्रम मागेच आहे.
संबंधित बातम्या