Shiv Thakare : बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेला रडू कोसळलं; नेमकं काय झालं?
Shiv Thakare : बिग बॉसच्या आगामी भागात आपला माणूस अर्थात शिव ठाकरे रडताना दिसणार आहे.
![Shiv Thakare : बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेला रडू कोसळलं; नेमकं काय झालं? Shiv Thakare burst into tears in Bigg Boss house What exactly happened Shiv Thakare : बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेला रडू कोसळलं; नेमकं काय झालं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/05/16ae11e5cb94972e99f84626bc91b9cb1670217567468254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shiv Thakare : मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडत असला तरी हिंदी बिग बॉस मात्र टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारत आहे. स्पर्धकांमध्ये होणाऱ्या वादामुळे हा कार्यक्रम अधिकच रंजक होत चालला आहे. आता या बहुचर्चित कार्यक्रमाच्या आगामी भागात मराठी बिग बॉस गाजवणारा शिव ठाकरे (Shiv Thakare) रडताना दिसणार आहे.
'बिग बॉस'च्या घरात रंगणार 'फॅमिली वीक' टास्क
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस घरातील स्पर्धकांना म्हणत आहेत,"गेल्या काही दिवसांपासून तुम्ही तुमच्या कुटुंबियांपासून दुर आहात. आता तुम्हाला नक्कीच त्यांची आठवण येत असेल. चला तर मग त्यांच्यासोबत संवाद साधा. 'फॅमिली वीक' टास्क' अंतर्गत घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधता येणार आहे.
View this post on Instagram
'फॅमिली वीक' टास्क दरम्यान शिव ठाकरे भावूक झाला असून आणि त्याला अश्रू अनावर झाले आहेत. कन्फेशन रुममध्ये तो बिग बॉसला सांगतोय,"मी डोक्याने खेळतो असा अनेकांचा समज आहे. पण मी माझ्या मनाचं ऐकतो हे घरच्यांना माहित आहे. मी त्यांच्यासमोर रडलो तर त्यांना मी कमजोर वाटेल. त्यामुळे मला रडताही येत नाही", असं म्हणत शिव रडायला लागतो.
मराठी बिग बॉसमध्ये शिव ठाकरेने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. हिंदी बिग बॉसमुळे त्याचा चाहतावर्ग वाढला आहे. दिवसेंदिवस त्याच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. मराठीप्रमाणे भाईजानचा बिग बॉसदेखील तो गाजवत आहे. सोशल मीडियावरदेखील तो ट्रेडिंगमध्ये आहे. त्याची प्रत्येक खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss 16 : बिग बॉसच्या घरातून हरियाणाची 'शकीरा' गोरी नागोरी आऊट; बाहेर पडल्यावर मराठमोळ्या शिव ठाकरेला म्हणाली,"सरड्यासारखा रंग बदलणारा..."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)