एक्स्प्लोर

Liger Trailer  : विजय देवरकोंडाची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री; लायगरचा जबरदस्त ट्रेलर रिलीज

‘लायगर’ (Liger) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

Liger Trailer  : दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता  विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्याचा ‘लायगर’ (Liger) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील विजयच्या अॅक्शननं आणि अनन्या पांडेच्या (Ananya Panday) ग्लॅमरस अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

विजय देवरकोंडा हा लायगर या चित्रपटामध्ये फायटरची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील विजयच्या फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्री अनन्या पांडेनं विजयच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. तर राम्या कृष्णन यांनी विजयच्या आईची भूमिका साकारली आहे. 

पाहा ट्रेलर: 

लायगर चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही  करण जोहरनं केली आहे. 'लायगर' हा चित्रपट 25 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी  'लायगर'  या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'अकडी पकडी' हे गाणं रिलीज झालं. 

लायगरचा पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या पोस्टरला अनेकांची पसंती मिळाली.  समंथा रुथ प्रभूपासून ते जान्हवी कपूर, सारा अली खान, रश्मिका मंदाना, अनुष्का शेट्टी, पूजा हेगडे आणि अनन्या पांडे या भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींनी या पोस्टरचे कौतुक केले आहे. या पोस्टरने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वात जलद गतीने 1 दशलक्ष लाईक्स गाठणारे हे पहिले भारतीय चित्रपट पोस्टर बनले आहे. या पोस्टरने अवघ्या 4 तासांत हा विक्रम केला आहे. 

दिशा पाटनीनं चित्रपटात काम करण्यास दिला नकार

लायगर या चित्रपटातील प्रमुख भूमिकेची ऑफर अभिनेत्री दिशानं पाटनीनं नाकारली. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे कथानक दिशाला आवडले नाही त्यामुळे या चित्रपटात काम करण्यास दिशानं नकार दिला. त्यानंतर या भूमिकेची ऑफर अभिनेत्री अनन्या पांडेला देण्यात आली. 

हेही वाचा:

Liger Trailer Launch : विजय देवरकोंडाच्या 'लायगर' चित्रपटाचा ट्रेलर होणार लाँच; 'या' बॉलिवूड अभिनेत्याची विशेष उपस्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget