एक्स्प्लोर

ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन

मुंबई: कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी हरहुन्नरी अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालं. त्या 59 वर्षांच्या होत्या. बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रीमा लागू परिचीत होत्या. छातीत दुखू लागल्याने त्यांना काल मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. रीमा लागू यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात मोठं योगदान दिलं. पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे लग्नानंतर रीमा लागू या नावाने ओळखल्या जात. रीमा लागू यांनी सुमारे चार दशकं चित्रपट आणि नाट्य सृष्टी गाजवली. रीमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. बॉलीवूडमधील मायाळू आई म्हणूनही त्या परिचीत होत्या. 'कुछ कुछ होता है' मध्ये काजोलची आई, 'हम आपके हैं कौन' मध्ये माधुरी दीक्षितची आई, 'वास्तव'मध्ये संजय दत्तची आई आणि मैने प्यार किया सिनेमात सलमान खानची आई, यासारख्या दमदार भूमिका साकारल्या आहेत. घरातूनच अभिनयाचे धडे रीमा लागू यांचा जन्म 1958 मध्ये झाला. घरातूनच त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. त्यांची आई मंदाकिनी भडभडे यांचं 'लेकुरे उदंड जाहले' हे नाटक प्रचंड गाजलं होतं. रीमा लागू यांचं पुण्यात शालेय शिक्षण सुरु होतं, त्याचवेळी त्यांना अभिनयाचे धडेही देण्यात आले. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी अभिनयाचे व्यावसायिक शिक्षण घेतलं. त्यानंतर मराठी रंगभूमीवरुन त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाय ठेवला. विवेक लागू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर नयन भडभडे या रीमा लागू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र काही वर्षानंतर दोघेही वेगवेगळे झाले. मृण्मयी लागू या रीमा लागू यांच्या कन्या. त्या स्वत:ही नाट्य, सिनेअभिनेत्री आहेत. रीमा लागू यांचे गाजलेले सिनेमे मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, वास्तव, साजन, कुछ कुछ होता है, आशिकी, कयामत से कयामत तक हिंदी दूरदर्शन मालिका श्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं मराठी नाटक घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रियाRohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेटHingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवातTop News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Embed widget