एक्स्प्लोर

#AskSRK | 'भाई मन्नत विकणार का?' ; चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर शाहरुख खानचं हटके उत्तर

शाहरुख खानने ट्विटरवर त्याच्या चाहत्यांसाठी 'आस्क मी एनिथिंग' हे सेशन ठेवले होते. त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याच्या करिअरपासून ते त्याच्या परिवाराशी संबंधीत अनेक प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नाची शाहरुख खानने त्याच्या अंदाजात मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

मुंबई : बॉलिवूडचा बादशहा अशी ओळख असलेला शाहरुख खान त्याच्या अनोख्या अंदाजासाठी प्रसिध्द आहे. त्याचा चाहता वर्ग भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आहे. त्याच्या प्रत्येक कृतीला त्याच्या चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. असाच एक अनुभव नुकताच आलाय. शाहरुख खानने ट्विटरवर त्याच्या चाहत्यांसाठी 'आस्क मी एनिथिंग' हे सेशन ठेवले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून शाहरुखनेही त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

एका चाहत्याने शाहरुखला विचारले की, 'क्वॉरंटाईनमध्ये काय केलंस? त्यावर शाहरुखने उत्तर दिले की 'चित्रपट पाहण्यात' गेले. त्यावेळी शाहरुखने चाहत्यांना त्याच्या दिनक्रमाविषयी सुध्दा माहिती दिली. त्याने सांगितले की, 'त्याचा बराच काळ हा मुलांसोबत वर्कआऊट करण्यात आणि क्रिकेट खेळण्यात जातो. यावेळी शाहरुखने त्याच्या चाहत्यांना सांगितले की, 'त्याने लॉकडाऊनच्या काळात कुटुंबासोबत वेळ घालवला. "तू या काळात जेवण बनवायला शिकलास का?" या एका चाहत्याच्या प्रश्नावर त्याने सांगितले की, "प्रामाणिकपणे मी सांगतो की, आजही जेवणात मीठ किती टाकायचे हे मला समजत नाही."

अजून 50 वर्ष चित्रपटात काम करणार

एका चाहत्याने विचारले की, 'सुहाना, आर्यन आणि अबराम तुला डॅड म्हणतात की डॅडी?' यावर शाहरुखने सांगितले की, 'ते मला 'पापा' असे म्हणतात. एका चाहत्याने विचारले की, 'सर माझ्या आयुष्यात आता 50 वर्षे राहिली आहेत. तोपर्यंत तुम्ही नव्या चित्रपटाची घोषणा करणार का?' त्यावर शाहरुखने म्हटले की, 'चित्रपटात काम करता करता माझ्या आयुष्याचा 50 वर्षाहून अधिक काळ गेला. यापुढेही मी हेच करत राहणार आहे आणि पुढच्या 50 वर्षात तुम्ही कृपा करुन ती बघा.'

'मन्नत' विकणार का? 

एका चाहत्याने शाहरुखला त्याच्या मन्नत बंगल्याच्या विक्रीबाबत एक प्रश्न विचारला. चाहत्याने विचारले की, "भाई मन्नत विकणार आहे का?" त्यावर शाहरुखने आपल्या हटके अंदाजात उत्तर दिले. तो म्हणाला की, 'मन्नत विकली जात नाही, ती विनम्रतेने मागितली जाते. हे लक्षात ठेवलंस तर आयुष्यात खूप काही मिळवशील.'

शाहरुख खानच्या मोहब्बतें या चित्रपटाला मंगळवारी 20 वर्षे पूर्ण झाली. त्यावर शाहरुख खानने आनंद व्यक्त केला आणि या चित्रपटातील प्रसिध्द झालेल्या आयकॉनिक लाईनचे ट्वीट केले, "प्यार ऐसे होता है... 20 वर्षानंतर ही ओळ मी पु्न्हा म्हणतोय. एका लहानशा स्टुडियोत आदी सोबत या चित्रपटाचे रेकॉर्डिंग केले होते आणि यशजींना ते पसंत पडले होते."

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget