एक्स्प्लोर

सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींनी दाखल केलेली याचिका रद्द करा, रिया चक्रवर्तीची हायकोर्टाला विनंती

सध्या अगदीच प्राथमिक अवस्थेत असल्यानं एफआयआरच रद्द करण्याची विनंती करणारी ही याचिका अयोग्य आहे असा दावाही रियाच्यावतीनं करण्यात आला आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींनी दाखल केलेली याचिका रद्द करा अशी विनंती रिया चक्रवर्तीच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचा याप्रकरणातील तपास सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे त्यांना तपासासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे, असं मत या प्रतिज्ञापत्रातून व्यक्त करण्यात आलं आहे. तपास सध्या अगदीच प्राथमिक अवस्थेत असल्यानं एफआयआरच रद्द करण्याची विनंती करणारी ही याचिका अयोग्य आहे असा दावाही रियाच्यावतीनं करण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात अटक होण्याआधी रिया चक्रवर्तीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी सुशांतच्या दोन बहिणींविरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यावर मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलिस स्थानकांत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी सुशांतच्या दोन्ही बहीणींनी प्रियंका सिंह आणि मितू सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावर प्राथमिक सुनावणी झाली. यात रिया चक्रवर्तीच्यावतीनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

दुसरीकडे याचिकाकर्त्यांच्यावतीनं अॅड. माधव थोरात यांनी कोर्टाला सांगितलंय की, हा निव्वळ या प्रकरणातील प्रमुख आरोपीचा प्रतिहल्ला आहे. अटकेच्या काही तास आधी रिया चक्रवर्तीनं मुंबई पोलिसांत एक तक्रार दाखल केली. ज्यात तिनं आरोप केलाय की, सुशांतच्या बहीणी त्याला एनडीपीएस कायद्यानं प्रतिबंधित केलेलं औषध देत होत्या. त्यासाठी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रूग्णालयातील डॉ. तरूण कुमारनं प्रिस्क्रीप्शन दिलं होतं. मात्र जर एखाद्या डॉक्टरनं लिहून दिलं असेल तर ते औषध दिल्याबद्दल देणा-यावर कसा काय गुन्हा दाखल होऊ शकतो?, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच तूर्तास सीबीआयनं याचिकाकर्त्यांविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश देण्याचा मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे.

सध्या याप्रकरणाचा तपास सीबीआय करत असल्यानं त्यांना यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. तसेच या प्रकरणात तक्रारदार रिया चक्रवर्तीच्या वकिलांनीही आपलं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागून घेतला होता त्यानुसार हे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करण्यात आलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prince Narula Fans Giving Threat To Divya Agarwal: '10 मुलं घेऊन...', ज्याला भाऊ मानलं, त्याचेच फॅन्स देतायत अत्याचाराच्या धमक्या; अभिनेत्रीकडून घाणेरड्या मेसेजचे स्क्रिनशॉर्ट शेअर
'10 मुलं घेऊन...', ज्याला भाऊ मानलं, त्याचेच फॅन्स देतायत अत्याचाराच्या धमक्या; अभिनेत्रीकडून घाणेरड्या मेसेजचे स्क्रिनशॉर्ट शेअर
Bol Bol Rani Movie Release Date Out: खुर्चीत बसलेली एक तरुणी, बांधलेले हात अन् बंदुकीतून सुटलेली गोळी; डोकं भंडावणारा आगामी मराठी सिनेमा कधी रिलीज होणार?
खुर्चीत बसलेली एक तरुणी, बांधलेले हात अन् बंदुकीतून सुटलेली गोळी; डोकं भंडावणारा आगामी मराठी सिनेमा कधी रिलीज होणार?
Cricketer Son Become Bollywood Actor: मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
Hansika Motwani Officially Divorced From Husband Sohael Khaturiya: सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या सुखी संसाराचा 'दी एन्ड'; चारच वर्षांत मोडला संसार, कोणत्याही पोटगीशिवाय पतीपासून विभक्त
सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या सुखी संसाराचा 'दी एन्ड'; चारच वर्षांत मोडला संसार, कोणत्याही पोटगीशिवाय पतीपासून विभक्त

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
Embed widget