एक्स्प्लोर
नसीरुद्दीन शाहांची राजेश खन्नांवर टीका, ट्विंकलचा करारा जवाब

मुंबईः अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या विषयी अपशब्द वापरले. त्याला राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्नाने झणझणीत उत्तर दिलं आहे. सर तुम्ही जिवंत माणसांचा आदर करु शकत नाही, तर निदान मृत-सामान्य व्यक्तीचा तरी आदर करा, जो तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही, अशा शब्दात ट्विंकल खन्नाने उत्तर दिलं. ट्विंकल नेहमीच आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे चर्चेत असते. यावेळी नसीरुद्दीन शहा यांना दिलेल्या उत्तरामुळे ट्विंकल पुन्हा चर्चेत आली आहे. https://twitter.com/mrsfunnybones/status/756880440712130560 सिनेमासृष्टीत 70 च्या दशकात सामान्यपणा आला होता. त्याचवेळी राजेश खन्नाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. राजेश खन्ना हा खूपच गरीब अभिनेता होता, असं विधान एका मुलाखतीत नसारुद्दीन शाहांनी केलं होतं. त्याला ट्विंकल खन्नाने उत्तर दिलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर





















