एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'टायगर'विरोधात 'देवा' राज ठाकरेंच्या दरबारात
'टायगर जिंदा है'चे शो हवे असतील तर थिएटरमधले 95 टक्के शो हे आम्हाला द्यायला हवेत, असा सज्जड दम या चित्रपटाकडून थिएटर ओनर्स, वितरक यांना भरण्यात आला आहे.
मुंबई : येत्या शुक्रवारी 'गच्ची' आणि 'देवा' हे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर त्यांच्यासमोर हिंदीत उभा ठाकतोय सलमान खानचा 'टायगर जिंदा है'. बऱ्याच दिवसांनी हिंदीत बिग बजेट सिनेमा येत असल्याने बॉलिवूडमध्ये आनंदाचं वातावरण आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनीही कंबर कसली आहे.
'ट्युबलाईट'नंतर सलमानचं अपयश धुवून काढण्यासाठी सर्व ती काळजी घेतली जात आहे. याचा मोठा फटका मराठी सिनेमाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मराठी आणि हिंदी या चित्रपटांचा पाद पुन्हा एकदा उफाळणार असं दिसतं.
'टायगर जिंदा है'चे शो हवे असतील तर थिएटरमधले 95 टक्के शो हे आम्हाला द्यायला हवेत, असा सज्जड दम या चित्रपटाकडून थिएटर ओनर्स, वितरक यांना भरण्यात आला आहे. यशराजसारखा मोठा बॅनर असल्यामुळे त्यांच्या हो ला हो करणं थिएटरवाल्यांच्या हातात आहे.
'देवा'च्या टीमला ही गोष्ट कळल्यावर त्यांनी थेट मनसेचा रस्ता धरला. दोन दिवसांपूर्वी देवाचे निर्माते, मनसेच्या सिनेशाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यात बैठक झाली असून, सिनेमाचे शो जाहीर झाले की मग याची रणनीती ठरवण्यात येणार आहे. याबाबत खोपकर यांनी थिएटरवाल्यांना लेखी पत्रही दिलं आहे.
मराठी चित्रपटाला प्राईम टाईम नाही दिला तर आपण आपल्या खास शैलीत समजावून सांगू असा इशाराही यात देण्यात आला आहे. यामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटांचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement