एक्स्प्लोर

Vijay Sethupathi: प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा 'सुपर डीलक्स' अभिनेता, साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती

ट्रान्सजेन्डर, अभिनेता ते व्हिलन असे वेगवेगळे अभिनय करुन प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या विजय सेतुपतीचा (Vijay Sethupathi) आज वाढदिवस आहे. सेल्समन, कॅशिअरची नोकरी करणारा विजय सेतुपती आज सुपरस्टार आहे.

Vijay Sethupathi Birthday: टॉलिवूडचा सुपरस्टार, निर्माता, संवाद लेखक आणि गीतकार विजय सेतुपतीला आज कोण ओळखत नाही. विजय सेतुपतीने आतापर्यंत एका पेक्षा एक अभिनय साकारुन एक वेगळी छाप उमटवली आहे. त्याच्या चित्रपटांची अगदी चातकासारखी वाट पाहिली जाते. विजय सेतुपती आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे.

आज सुपरस्टार असलेल्या विजय सेतुपतीला अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. त्याचा जन्म तामिळनाडूतील राजपालयम या गावातील अगदीच सामान्य परिवारात झाला. तो सहावीत शिकत असतानाच त्याच्या परिवाराने चेन्नईला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्याने धनराज बेद महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. खूपच हालाखीच्या परिस्थितीत त्याने दिवस काढले.

PHOTO | वाढदिवशीच ज्वाला गुट्टाचा दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत साखरपुडा

सेल्समन म्हणून काम केलं लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या विजयला त्याच्या कमी उंचीमुळे आणि चेहऱ्यामुळे कुठेही संधी मिळायची नाही. पदवी घेतल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्याने एका रिटेल स्टोअरमध्ये सेल्समनची नोकरी सुरु केली. त्यानंतर एका फास्ट फूडच्या दुकानात कॅशिअरची नोकरीही केली. आपल्या तीन भावंडांची आणि परिवाराची आर्थिक गरज भागवण्यासाठी विजय सेतुपतीने दुबईला जायचा निर्णय घेतला. परंतु या नोकरीत मन न लागल्याने त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

असा मिळाला ब्रेक दुबईवरुन परत आल्यानंतर विजयने चेन्नईचा एक थिएटर ग्रुप जॉईन केला. या ठिकाणी तो अभिनयासोबतच अकाउंटचे कामही करायचा. या थिएटर ग्रुपमध्ये काम करताना त्याने अभिनयातील बारीक पैलू शिकून घेतले. त्याला आता तामिळ चित्रपटात सपोर्टिंग अॅक्टरची भूमिका मिळू लागली. त्यानंतर विजय सेतुपतीने टीव्हीवरही काम करायला सुरुवात केलं. पण त्याला सर्वात मोठा ब्रेक मिळाला तो रामासामीच्या Thenmerku Paruvakaatru या चित्रपटातून. विजय सेतुपतीने या चित्रपटात लीड रोल केला. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि इथूनच विजय सेतुपतीच्या करिअरने वेग पकडला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

कोरोनाच्या प्रादुर्भावात दाक्षिणात्य सुपरस्टार नितिननं बांधली लग्नगाठ; फोटो व्हायरल

'सुपर डीलक्स' ची शिल्पा असो वा 'विक्रम वेधा' चा वेधा असो, ट्रान्सजेन्डरच्या भूमिकेपासून ते व्हिलनच्या भूमिकेपर्यंत विजय सेतुपतीने वेगवेगळ्या भूमिका केल्या. आपल्या प्रत्येक भूमिकेतून विजयने दर्जेदार अभिनय साकारले.

'96' मधला दमदार अभिनय विजय सेतुपतीने केवळ कॉमेडी ड्रामा अथवा थ्रिलर चित्रपटातच काम केलं नाही तर प्रेम कुमार निर्मित चित्रपट '96' मध्येही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. 2018 साली प्रदर्शित झालेला हा एक रोमॅन्टिक ड्रामा चित्रपट आहे. विजयने या चित्रपटात रामचंद्रन नावाच्या फोटोग्राफरची भूमिका केली आहे तर जानूच्या भूमिकेत अभिनेत्री त्रिशाने काम केलंय. शाळेत असताना हे दोघे एकमेकांवर प्रेम करायचे. त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी त्याची भेट एका रियुनियन पार्टीमध्ये होते आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. प्रत्येक प्रेमी युगुलाने पहावा असा हा चित्रपट आहे. विजय सेतुपतीला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय.

पोंगलच्या पार्श्वभूमीवर विजय सेतुपती आणि सुपरस्टार विजय या दोघांचा 'मास्टर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सध्या दक्षिण भारतात धुमाकूळ घालतोय.

रजनीकांत बनणार धनुष? थलैवावर नव्या वर्षात बनणार चित्रपट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर

व्हिडीओ

England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...
Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Embed widget