एक्स्प्लोर

रजनीकांत बनणार धनुष? थलैवावर नव्या वर्षात बनणार चित्रपट

रजनीकांत यांचा चित्रपट येणार हे बरोबर आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे ते रजनीकांत यांची भूमिका साकारणार कोण? रजनीकांत यांच्या सिनेमात त्यांची भूमिका अभिनेता धनुष साकारणार असल्याचं वृत्त आहे.

मुंबई : कोल्हापुरात शिवाजीराव गायकवाड नावानं एक तरुण काही काळ होता, तेव्हा त्याचं पुढं काय होणार आहे हे कुणालाच माहित नव्हतं. पण हा मनुष्य मेहनतीने दक्षिणेत गेला आणि तिथला सुपरडुपर स्टार झाला. तो इतका मोठा झाला की तो एक दंतकथा बनला. हाच शिवाजी गायकवाड बनला द रजनीकांत. रजनीकांतचा दबदबा.. त्यांची लोकप्रियता इतकी अफाट झाली की त्यांचे सिनेमे आले की त्यांच्या सिनेमांच्या दिवशी पहाटेपासून शो लागू लागले. त्यांच्या कटआऊट्सना अभिषेक घातला जाऊ लागला. रजनीकांत यांची महती होतीच तशी.

रजनीकांत हे सिनेमासृष्टीला पडलेलं स्वप्न आहे असं बोललं जातं. त्यांची स्टाईल.. त्यांचा उत्साह.. त्यांचं पडद्यावरचं वावरणं आणि वास्तव जीवनात अत्यंत साधेपणाने वावरणं हे सगळं रसिकांनी स्वीकारलं. एकिकडे सिनेमातले कलाकार पडद्याबाहेरही तरुण दिसण्याचा हट्ट धरत असताना रजनीकांत यांनी मात्र आपली दोन्ही आयुष्य वेगळी ठेवली. पडद्यावर काळ्याभोर केसांचा हा स्टाईलबाज नायक वास्तव जीवनात मात्र पांढऱ्या केसांचा टक्कल पडलेला सावळा सामान्य माणूस होता. पण रसिकांनी त्याच्यावरही तितकचं प्रेम केलं. रजनीकांत यांचं जगणं तितकंच रंजक आहे. महाराष्ट्रातल्या मातीतून आलेला हा कलाकार बघता बघता मोठा झाला. त्याचा हाच जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एन लिंगासामी हे दिग्दर्शक रजनीकांत यांचा हा चित्रपट करण्याच्या प्रयत्नात आहेत.

रजनीकांत यांचा चित्रपट येणार हे बरोबर आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे ते रजनीकांत यांची भूमिका साकारणार कोण? आता सध्या त्याचं उत्तर एकावर येऊन स्थिरावलं आहे. रजनीकांत यांच्या सिनेमात त्यांची भूमिका अभिनेता धनुष साकारणार असल्याचं वृत्त आहे. धनुष हा रजनीकांत यांचा जावईही आहे. त्यामुळे तो रजनीकांत आणि त्यांच्या कुटुंबियाना जवळून ओळखतो. शिवाय धनुषचा आपला असा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. त्याला ही भूमिका देऊ करण्यावर रजनीकांत यांनीही सहमती दर्शवल्याचं बोललं जातं. पण अद्याप धनुषने मात्र त्याला दुजोरा दिलेला नाही. सध्या धनुष दोन ते तीन सिनेमांमध्ये व्यग्र आहे. आनंद एल राय यांचा एक चित्रपटही तो करतो आहे. त्यामुळे या चित्रपटाला कधी सुरूवात होईल ते अद्याप गुलदस्त्यात आहे. पण नव्या वर्षातल्या उत्तरार्धात या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल असं बोललं जातं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mamachya Govyala Jauya: मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mithun Chakraborty Sridevi Affair Clim: 'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा
'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Prashant Kishor and Sunil Tatkare: 'मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या', प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Embed widget