एक्स्प्लोर
...म्हणून सलमानला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका
मुंबई: एकीकडे उरी हल्ल्यानंतर सर्व स्तरावर पाकची कोंडी सुरू असताना, बॉलिवूडचा सल्लू मात्र पाकिस्तानी कलाकारांच्या पाठीशी उभा राहीला. पण सलमान खानला पाकिस्तानच्या कलाकारांच्या पाठिशी का उभा राहिला? या मागे आर्थिक गणितं आहेत.
पाकिस्तानमध्ये सलमान खानच्या चित्रपटांची कमाई कोट्यवधींच्या घरात आहे. अनेकवेळा तर सलमानच्या चित्रपटांनी मूळच्या पाकिस्तानी चित्रपटांपेक्षा जास्त गल्ला कमवलाय.
सलमानच्या सुल्तान, बजरंगी भाईजान, किक, दबंग-2 आदी सिनेमांनी पाकिस्तानमध्ये कोट्यवधींचा गल्ला गोळा केला आहे. सलमानचे हे सगळे चित्रपट पाकिस्तानमध्ये सुपर-डुपर हिट ठरलेत. त्यामुळं पाकिस्तानातून होणाऱ्या कमाईवर पाणी सोडावं लागू नये म्हणून सलमाननं पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दर्शवल्याची चर्चा सुरु असल्याचं दिसतं
सलमान खानच्या चित्रपटांनी पाकिस्तानमध्ये कमाई
- सुलतान : 11.6 कोटी
- बजरंगी भाईजान : 60 लाख
- किक : 9.48 कोटी
- दबंग-2 : 38 लाख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement