(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exclusive | काय आहे त्या रात्रीचं सत्य? ज्या रात्री दिशाने आत्महत्या केली?
सुशांत सिंहची पूर्व मॅनेजर दिशा सालीयनने मालवण येथील एका इमारतीमधून उडी मारुन आत्महत्या केली होती. बिहार पोलीस सुशांत आणि दिशाच्या आत्महत्येचं काही संबंध तर नाही ना याचा तपास लावत आहेत मात्र या संबंधाची माहिती एबीपी माझा च्या हाती लागली आहे.
मुंबई : सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला वांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. ज्याचा तपास मुंबई पोलीस करत आहे. दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला असून मुंबई पोलीसांनी आत्तापर्यंत 56 लोकांचा जबाब नोंदवला आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर आज असमाधान व्यक्त करत सुशांत सिंहाच्या वडीलांनी बिहारच्या पाटणा येथे सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासंदर्भात तक्रार दाखल केली. ज्याच्या तपासासाठी बिहार पोलिसांची टीम मुंबईत दाखल झाली. सुशांतच्या मृत्यूच्या एक आठवड्यापूर्वी म्हणजेच 8 जून रोजी सुशांत सिंहची पूर्व मॅनेजर दिशा सालीयनने मालवण येथील एका इमारतीमधून उडी मारुन आत्महत्या केली होती. बिहार पोलीस सुशांत आणि दिशाच्या आत्महत्येचं काही संबंध तर नाही ना याचा तपास लावत आहेत मात्र या संबंधाची माहिती एबीपी माझा च्या हाती लागली आहे.
काय झालं होतं 8 जूनला ?
मालवणी मालाड येतील रीजंट गॅलेक्सी बिल्डिंग मध्ये दिशा सालीयान आणि तिचा होणारा नवरा रोहन रॉय आणि दिशाचे शाळेतील मित्र दीप अजमेरा, इंद्रणील वैद्य, हिमांशु, रेषा पडवल हे इंद्रणील आणि दिशाच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी जमले होते. मेहफिल चांगलीच रंगली होती सर्वच पार्टीमध्ये मशगुल झाले होते. दिशाची मैत्रीण अंकिता जी लंडन मध्ये राहते तिचा रात्री 11.45 ला फोन आला. फोनवर झालेल्या संभाषणानंतर दिशा नैराश्यात होती. दिशाच्या मित्रांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र दिशा नैराश्यतच होती कारण दिशाचे दोन मोठे डील यशस्वी झाले नव्हते आणि कौटुंबिक कारणानंमुळे दिशा निराश होती.
दिशा कॉर्नर स्टोन कंपनीमध्ये सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून कामाला होती गेल्या आठ ते दहा महिन्यांमध्ये दिशाने काही सेलिब्रिटीचें शेड्युल मॅनेज करून त्यांचे इवेंट्स अॅडव्हर्टाइजमेंट आणि इतर कार्यक्रम हाताळली होती. गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये दिशाचे दोन मोठे डील जे विवो कंपनी आणि क्यूर फिट जिम बरोबर होते ते पूर्ण होऊ शकले नाही. ज्याच्यामुळे या कंपन्यांना मोठं आर्थिक नुकसान झालं ज्याचा ताण दिशाने स्वतःवर घेतला तर काही कौटुंबिक कारणांमुळे सुद्धा दिशा निराश होती.
अंकिताशी बोलणे झाल्यानंतर पार्टी मधील उपस्थित तिच्या मित्राने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र दिशाने थोडा वेळ बेडरूम मध्ये एकटच राहण्याच ठरवलं. थोड्या वेळानंतर दिशाचा होणारा नवरा रोहन दिशाला बघण्यासाठी बेडरूम मध्ये आला तेव्हा त्याला दिशा कुठे दिसली नाही, खिडकीमधून वाकून पाहिल्यावर दिशा इमारतीखाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दिशाला तात्काळ तिच्या मित्रांनी शताब्दी रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पोलिसांना कळताच पोलीस रुग्णालयात पोहोचले त्यानंतर घटनास्थळावर जाऊन पोलीसांनी पंचनामा करून सगळी माहिती मिळवली. पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे जबाब नोंदवले जे सारखेच होते. पोलिसांना काहीही संशयास्पद आढळले नाही. दिशाच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा डोक्याला आणि शरीराच्या इतर भागात गंभीर स्वरूपाच्या दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ही पाहिलं मात्र त्यामध्येही पोलिसांना काही सापडला नाही आणि पोलिसांनी अकॅसिडेंनटल डेथ रिपोर्ट म्हणून नोंद करत पोलीस पुढील तपास करत आहे.
K K Singh | सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी काहीही केलं नाही, के.के.सिंग यांची पहिली प्रतिक्रिया