एक्स्प्लोर

सुशांत सिंह राजपूत इम्पॅक्ट : 'सडक 2'च्या ट्रेलरला सर्वाधिक डिसलाईक

सडक 2 चा ट्रेलर सर्वाधिक नापसंत केलेला व्हिडीओ म्हणून समोर आला आहे. विशेष म्हणजे जगभरात सर्वाधिक नासपंत केलेल्या टॉप 50 व्हिडीओंमध्ये सडक 2 चा ट्रेलर अकराव्या स्थानावर पोहोचला आहे.

मुंबई : 'सडक 2' चित्रपटाचा ट्रेलर कालच म्हणजे 12 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आणि यू ट्यूबवर ट्रेण्डही होत आहे. 24 तासांच्या आत या ट्रेलरला एक कोटी 14 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूव्ज मिळाले. पण त्याचवेळी सडक 2 चा ट्रेलरला 43 लाखांपेक्षा जास्त डिसलाईक मिळाले आहे, जो एक विक्रमच म्हणावा लागेल. तर हा ट्रेलर लाईक करणाऱ्यांची संख्या केवळ अडीच लाखांच्या जवळपास आहे.

'सडक 2' चा ट्रेलरच्या लाईक आणि डिसलाईकमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. यू ट्यूबवर अपलोड केल्याच्या 12 तासातच हा ट्रेलर 36 लाखांपेक्षा जास्त वेळा डिसलाईक करण्यात आला. तर 20 लाख डिसलाईक 8 तासांच्या आत झाले. त्यामुळे हा ट्रेलर सर्वाधिक नापसंत केलेला व्हिडीओ म्हणून समोर आला आहे. विशेष म्हणजे जगभरात सर्वाधिक नासपंत केलेल्या टॉप 50 व्हिडीओंमध्ये 'सडक 2' चा ट्रेलर अकराव्या स्थानावर पोहोचला आहे.

याचा अर्थ स्पष्ट आहे की लोक मोठ्या संख्यने 'सडक 2'चा ट्रेलर नक्कीच पाहत आहेत, परंतु बॉलिवूमध्ये नेपोटिझम आणि नेपोटिझमच्या केंद्रस्थानी असलेल्या कलाकारांना घेऊन बनवलेल्या या चित्रपटाबाबत आपला संताप व्यक्त करताना थेट डिसलाईकचं बटण क्लिक करत आहेत. प्रेक्षक थेट 'सडक 2' च्या ट्रेलरवर निशाणा साधत आहेत.

Sadak 2 Trailer : रोमान्ससह अॅक्शनचा तडका, सडक 2 चा दमदार ट्रेलर लॉन्च

या चित्रपटात संजय दत्त, आलिया भट्ट, पूजा भट्ट आणि आदित्य रॉय कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हे सर्व कलाकार फिल्मी घराण्यातील आहे. प्रमुख भूमिकेत असलेल्या आलिया आणि पूजा या दोघी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट यांच्या मुली आहेत. विशेष म्हणजे महेश भट आणि चित्रपटाचे निर्माते मुकेश भट यांचे वडीलही चित्रपटसृष्टीतीलच होते. नानाभाई भट आपल्या काळातील प्रख्यात सिनेमॅटोग्राफर होते. तर संजय दत्त हा सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचा मुलगा आहे. याशिवाय आदित्य रॉय कपूर हा चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरचा भाऊ आहे.

नेपोटिझमने भरलेला हा चित्रपट न पाहण्याचे संकेत प्रेक्षक ट्रेलर डिसलाईक करुन देत आहेत. सोशल मीडियार या चित्रपटाच्या ट्रेलरवर कठोर शब्दा कमेंट आणि टिप्पणी केली जात आहे. यावरुनच त्यांची नाराजी स्पष्ट होत आहे.

नेपोटिझमुळे 'सडक 2' न पाहण्याचं आणि ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे ते म्हणजेच डिस्ने हॉटस्टार अॅप अनइन्स्टॉल करण्याची विनंती काही जण करत आहे. इतकंच नाही या चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री आलिया भटने हा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला, मात्र तिने आपला कमेंट बॉक्स बंद केला, जेणेकरुन नेटिझन्स तिच्यावर किंवा चित्रपटावर काही वाईटसाईट कमेंट्स करु नयेत.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने बॉलिवूडला जोरदार झटका बसला. लोक सातत्याने सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत. तर नेपोटिझमवरुन बॉलिवूडच्या स्टारकिड्स विरोधात संतापही व्यक्त करत आहेत. परंतु त्याचा फटका सध्या 'सडक 2'च्या ट्रेलरला बसत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
Embed widget