एक्स्प्लोर
अभिनेत्री सनी लिओन चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात

मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून जम बसवण्याचा प्रयत्न करणारी अभिनेत्री सनी लिओन आता चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरणार आहे. सनी स्वतः अभिनयही करत असलेल्या आगामी थ्रिलरपटाच्या निर्मितीची धुरा तिने खांद्यावर घेतली आहे.
यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होण्याची आशा सनीने व्यक्त केली आहे. सिनेमाचं नाव अद्याप निश्चित झालेलं नसलं, तरी हा ड्रामा-थ्रिलर आहे, अशी माहिती तिने दिली. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वासही सनी लिओनला वाटतं.
'मी या चित्रपटात अभिनय करणार आहे. चित्रपट चालण्याच्या दृष्टीने हे फायद्याचं ठरेल. बाकी गोष्टींवर काम सुरु आहे.' असं सनी म्हणते. याशिवाय एका सुपरहिरो सिनेमाच्या निर्मितीतही सनीने उत्सुकता दाखवली आहे.
सुपरहिरोवरील चित्रपटाविषयी गांभीर्याने विचार सुरु असला तरी थ्रिलर चित्रपटाला प्राधान्य राहील, असं सनीने सांगितलं आहे. तिचा 'वन नाईट स्टॅण्ड' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे, तर शाहरुखच्या 'रईस'मध्येही ती आयटम नंबरवर थिरकताना दिसणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
विश्व
शेत-शिवार
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
