एक्स्प्लोर
Advertisement
सलमानच्या 'सुलतान'ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी घोडदौड
मुंबई : ईदच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सलमान खानच्या 'सुलतान' सिनेमाची घोडदौड सुरुच आहे. बुधवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने एक्स्टेन्डेड विकेंड म्हणजेच बुधवार ते रविवार या पाच दिवसांत 180.36 कोटींचा गल्ला जमवला आहे.
पहिल्या दिवशी सुलतानने 36.54 कोटी रुपयांचा गल्ला जमवून 2016 या वर्षातली विक्रमी ओपनिंग मिळवली होती. ईद एक दिवस पुढे गेल्यामुळे प्रत्यक्ष ईदच्या दिवशी सुलतानची कमाई त्याहून जास्त म्हणजे 37.32 कोटी इतकी झाली.
शुक्रवारी सुलतानने 31.67 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. त्यानंतर विकेंडला म्हणजे शनिवारी 36.62 कोटी तर रविवारी 38.21 कोटी रुपये कमावले. तीन दिवसांत 100 कोटींच्या बॉक्समध्ये प्रवेश करत एक्स्टेन्डेड विकेंड (बुधवार ते रविवार हे पाच दिवस) मध्ये सुलतानने 180.36 कोटींची कमाई केली.
सुलतान हा सिनेमा अली अब्बास जाफर यांनी दिग्दर्शित केला आहे. सलमान खानने सुलतान पैलवानाची भूमिका साकारली आहे. तर अनुष्का शर्माही मुख्य भूमिकेत आहे.
दिवस - कमाई (कोटींमध्ये)
बुधवार (6 जुलै) - ₹ 36.54
गुरुवार (7 जुलै) - ₹ 37.32
शुक्रवार (8 जुलै) - ₹ 31.67
शनिवार (9 जुलै) - ₹ 36.62
रविवार (10 जुलै) - ₹ 38.21
एकूण - ₹ 180.36
संबंधित बातम्या :
पाकिस्तानमध्येही 'सुलतान'चा धुमाकूळ, सर्व रेकॉर्ड मोडित
'सुलतान'च नव्हे, सलमानच्या या 9 सिनेमांची 100 कोटींची कमाई
सुलतानच्या सिक्वेलच्या चर्चेवर दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण
सलमानचा ‘सुलतान’ जबराट, ‘पीके’चा रेकॉर्ड मोडणार : आमीर खान
फोटो – ‘सुलतान’ची रेकॉर्डब्रेक कमाई
‘सुलतान’चे दहा सुपरहिट डायलॉग
सुलतान का पाहावा?
पहिल्याच दिवशी ‘सुलतान’ची रेकॉर्डब्रेक कमाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement