एक्स्प्लोर
‘बाल्ड इज ब्युटिफुल’, फ्रेंडशिप डे निमित्त सोनाली बेंद्रेची भावनिक पोस्ट
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार घेत असलेल्या सोनालीने डोक्यावरचे पूर्ण केस काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार घेत असलेल्या सोनालीने डोक्यावरचे पूर्ण केस काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तिचा हा फोटो अभिनेता ऋतिक रोशनने काढला आहे. ‘डोक्यावर केस नसल्यामुळे तयार व्हायला वेळ लागत नाही, केस सावरावे लागत नाही. त्यामुळे, बाल्ड इज ब्युटिफुल्ल,’ असं म्हणत सोनालीने सकारात्मक संदेश दिला. फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देताना सोनाली बेंद्रेने तिच्या मैत्रिणी कशा तिच्यासोबत सतत फोन, मेसेज, फेसटाईम किंवा प्रत्यक्ष भेटायला येऊन वेळ घालवतात हे सांगितलं. या फोटोत सोनालीसोबत गायत्री ओबेरॉय आणि सुझान दिसत आहेत.
कॅन्सरवरील उपचारात सोनालीला डोक्यावरील सर्व केस काढावे लागले. लोकांना विश्वास बसत नाही, पण अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं हे सत्य पचवलं आहे. तसंच तिला पाहून चकीत होणाऱ्यांनाही ते पचवायला भाग पाडलं आहे. सोनालीचा कॅन्सरसोबत लढा बॉलिवूड कलाकारांची दुर्धर आजारांची मालिका वाढत आहे. अभिनेता इरफान खाननंतर सोनाली बेंद्रेचं नाव या यादीत आलं. सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाला आहे. हायग्रेड कॅन्सरचा साधा अर्थ म्हणजे वेगाने पसरणारा कॅन्सर. सध्या ती अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे.#SwitchOnTheSunshine #OneDayAtATime #HappyFriendshipDay 🤞🌞 pic.twitter.com/j6MF0UKyb7
— Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) August 5, 2018
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























