Sidhu Moose Wala : सिद्धू मूसेवालाच्या गाण्याचा नवा विक्रम, ‘बिलबोर्ड 200’च्या यादीत ‘295’ला मिळाले मानाचे स्थान!
Sidhu Moose Wala : सिद्धू मूसेवालांच्या '295' या गाण्याने जागतिक ‘बिलबोर्ड 200’च्या यादीमध्ये स्थान निर्माण केले आहे. मात्र, हे यश पाहायला सिद्धू आज आपल्यात नाहीत.
Sidhu Moose Wala : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांची फॅन फॉलोइंग देशातच नाही, तर परदेशातही आहे. आता सिद्धू मूसेवालांच्या '295' या गाण्याने जागतिक ‘बिलबोर्ड 200’च्या यादीमध्ये स्थान निर्माण केले आहे. मात्र, हे यश पाहायला सिद्धू आज आपल्यात नाहीत. या विक्रमानंतर चाहते त्यांची आठवण करून भावूक होत आहेत आणि सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या आठवड्यात सिद्धू मूसेवाला यांचे ‘295’ हे गाणे जागतिक बिलबोर्ड यादीत 154व्या क्रमांकावर आहे.
सिद्धू मुसेवाला यांचे खरे नाव शुभदीप सिंह होते. 'सो हाय', 'द लास्ट राईड' आणि 'जस्ट लिसन' सारखी गाणी गाऊन त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती. सिद्धू मूसेवाला यांचे '295' हे गाणे जुलै 2021मध्ये रिलीज झाले होते. यूट्यूबवर हे गाणे ऐकणाऱ्यांची संख्याही दोन कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. 100 म्युझिक व्हिडीओंच्या जागतिक यादीत हे गाणे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. याशिवाय 'द लास्ट राईड' हे गाणे आता सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. यूट्यूबवर या व्हिडीओला 73 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. YouTube Musicवरील जागतिक यादीत '295' चौथ्या क्रमांकावर आहे.
‘या’ कलाकारांच्या गाण्यांचाही समावेश!
अमेरिकन गायिका केट बुशच्या ‘रनिंग अप दॅट हिल’ हे गाणे जागतिक बिलबोर्ड 200च्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याच वेळी, या यादीत इडी शीरन, हॅरी स्टाइल्स, लिझो, बॅड बनी, कॅमिला कॅबेलो आणि जस्टिन बीबर यांच्या गाण्यांचाही समावेश आहे. या यादीत सिद्धूचे नाव आल्याने चाहते खूप खूश आहेत.
सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सिद्धू यांच्या हत्येने सर्वांनाच हादरवून सोडले होते. मनोरंजन विश्वाशी संबंधित अनेक कलाकारांनी मूसवाला यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. प्रसिद्ध रॅपर ड्रेक यांनीही 30 मे रोजी मुसेवाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. याशिवाय न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये सिद्धू यांच्या गाण्याच्या क्लिप वाजवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती.
संबंधित बातम्या