एक्स्प्लोर
'ठाकरे'चं पोस्टर न लावल्याने शिवसैनिकांचा थिएटरबाहेर गोंधळ
आयनॉक्स या मल्टिप्लेक्समध्ये थिएटर मालकांनी ‘ठाकरे’ चित्रपटाचे पोस्टर न लावल्यामुळे शिवसैनिकांनी चित्रपटगृहात जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
नवी मुंबई : बहुचर्चित 'ठाकरे' चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सकाळपासून सर्वच चित्रपटगृहांमध्ये 'ठाकरे' चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे. वाशी येथील आयनॉक्स या मल्टिप्लेक्समध्ये थिएटर मालकांनी ‘ठाकरे’ चित्रपटाचे पोस्टर न लावल्यामुळे शिवसैनिकांनी चित्रपटगृहात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत चित्रपटाचे पोस्टर लावले जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतला होता.
आयनॉक्स हे चित्रपटगृह वाशी रेल्वेस्थानकाबाहेरील रघुलीला मॉलमध्ये आहे. त्यामुळे चित्रपटगृहाबाहेर, मॉल परिसरात शिवसैनिकांनी आंदोलन केले. शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत होते. सकाळी या परिसरात शिवसैनिकांनी घातलेल्या गोंधळामुळे कामावर जाणारे चाकरमानीदेखील गोंधळले होते. या प्रकारामुळे रेल्वेस्थानक परिसर आणि बस स्टॅन्डवरील प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी आठ वाजता ऑयनॉक्समध्ये ठाकरे चित्रपटाचा शो होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा बायोपिक म्हटल्यावर वाशी, कोपरखैरणे, सानपाडा, तुर्भे, घणसोली परिसरातील शिवसैनिकांनी सकाळी सात वाजताच आयनॉक्स गाठले होते. परंतु मल्टीप्लेक्सबाहेर 'ठाकरे' चित्रपटाचे एकही पोस्टर नव्हते. त्याऐवजी इतर हिंदी व इंग्रजी चित्रपटांचे पोस्टर्स होते. तसेच अद्याप प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांचे पोस्टर्सदेखील पहायला मिळत होते. परंतु ठाकरे चित्रपटाचे एकही पोस्टर नसल्यामुळे शिवसैनिक संतापले आणि त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
अखेर अर्ध्या तासांच्या आत पोस्टर लावले जाईल असे मल्टीप्लेक्स प्रशासनाने शिवसैनिकांना सांगितल्यानंतर शिवसैनिक शांत झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement