(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sherlyn Chopra On Raj Kundra: शर्लिन चोप्राची पुन्हा एकदा राज कुंद्राविरोधात पोलिस तक्रार; अनेक गंभीर आरोप
पॉर्न व्हिडिओ प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राविरोधात अभिनेत्री शर्लिन चोप्राने आणखी एक तक्रार दाखल करत काही आरोप लावले आहेत.
Sherlyn Chopra On Raj Kundra: पॉर्न व्हिडिओ प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राविरोधात अभिनेत्री शर्लिन चोप्राने आणखी एक तक्रार दाखल केली. शर्लिनने राज कुंद्राच्या जेएल स्ट्रीम कंपनीसाठी 3 व्हिडिओ शूट केले, पण तिला सांगितल्याप्रमाणे पैसे दिले गेले नाहीत. प्रत्येक व्हिडीओसाठी शर्लिनला 16 लाख म्हणजेच 3 व्हिडीओसाठी 48 लाख दिले जाणार होते, पण शर्लिनचा दावा आहे की आजपर्यंत तिला तिच्या बोल्ड व्हिडिओंसाठी एक पैसाही दिला गेला नाही.
शर्लिनने जुहू पोलीस ठाण्यात तसेच राज कुंद्रावर दोन वर्षांपूर्वी शर्लिनच्या घरी लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे.
शर्लिनने दावा केला आहे की दोन वर्षांपूर्वी राज कुंद्राच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर राज कुंद्रा तिला भेटला होता आणि तिला त्याच्या फोनवर एक नंबर दाखवला होता की हा (रणजीत बिंद्रा) माणूस डी कंपनी म्हणजेच दाऊदचा माणूस आहे आणि जर तिने लैंगिक शोषण प्रकरणाची तक्रार मागे घेतली नाही तर मग डी कंपनीचा माणूस तिच्यासोबत काहीही करू शकतो.
शर्लिन चोप्रा म्हणते की भीतीमुळे आणि सिंगल मुलगी असल्याने तिने राज कुंद्राविरोधातील लैंगिक शोषणाची तक्रार पोलीस ठाण्यात जावून मागे घेतली होती. शर्लिन म्हणाली की तिने शिल्पा शेट्टीसोबत देखील या विषयावर चर्चा केली होती. त्यावेळी शिल्पा म्हणाली, की "माझे पती शक्ती कपूर आहे का?..."
शर्लिनने सांगितले की, ज्या तीन व्हिडीओत काम करण्यासाठी तिला पैसे दिले नाही. त्या कामासाठी तयार करण्यासाठी राज कुंद्रा 10 महिने प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याने सांगितले की शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी देखील जेएल स्ट्रीम कंपनीचा भाग आहेत.
शर्लिनने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, जर राज कुंद्रा याने व्यावसायिक करार केला असेल तर त्याने एका व्यावसायिकासारखे वागायला हवे होते आणि तिला कामासाठी मोबदला मिळायला हवा होता, परंतु राजने तिची फसवणूक केली.
एबीपी न्यूजने जेव्हा तिला विचारले की तिने पैसे मिळवण्यासाठी राज कुंद्रा किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधला होता का, शर्लिनने सांगितले की तिने राज कुंद्राला फोन केला होता पण त्याने फोन उचलला नाही.
शर्लिन म्हणाली की त्यानंतर तिने राज कुंद्राच्या कायदेशीर प्रतिनिधीशी चर्चा केली पण तिथूनही योग्य उत्तर मिळाले नाही आणि नंतर तिला सांगण्यात आले की जर तिला या प्रकरणात कायद्याची मदत घ्यायची असेल तर ती करू शकते.
शर्लिन म्हणाली की ती यापुढे राज कुंद्रासोबत न्यायालयाबाहेर समझोता करणार नाही आणि सर्व आरोपांबाबत ती राजला कोर्टात खेचेल.