Shah Rukh Khan : "काही लोक सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवतायत" 'पठाण'च्या वादात शाहरुख खानचं वक्तव्य
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली जातेय.
Pathaan Besharam Rang controversy : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण चित्रपटातील (Pathaan Movie) 'बेशरम रंग' (Beshram Rang Song) या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे. यावर नुकत्याच कोलकाता येथे झालेल्या 28 व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शाहरूख खान म्हणाला की, "काही लोक सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवत आहेत. सिनेमा हे समाज बदलण्याचे माध्यम आहे.
कोलकाता येथे पार पडलेल्या 28 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये (28th International Kolkata Film Festival in Kolkata) अभिनेता शाहरूख खान यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला की, "काही लोक सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवत आहेत. सिनेमा हे समाज बदलण्याचे माध्यम आहे. तसेच, जग काहीही करो. मी, तुम्ही आणि सकारात्मक लोक अजून जिवंत आहेत." असं वक्तव्य शाहरूख खानने केलं आहे.
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचा आक्षेप
माध्यमांशी बोलताना राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) म्हणाले की, "दीपिका पदुकोणने गाण्यात घातलेले कपडे आक्षेपार्ह आहेत. हे गाणे भ्रष्ट मानसिकतेतून चित्रित करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. चित्रपट निर्मात्यांनी हा सीन दुरुस्त करावा अशी आमची मागणी आहे, जर असे झाले नाही तर आम्ही मध्यप्रदेशात या चित्रपटावर बंदी घालण्याचा विचार करू." असे ते म्हणाले.
'या' कारणावरून वाद सुरू झाला
पठाण सिनेमाचं पहिलं गाणं 'बेशरम रंग' (Beshram Rang) 12 डिसेंबर रोजी रिलीज झालं होतं. या गाण्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Dipika Padukone) आणि शाहरुख खानची केमिस्ट्री दाखविण्यात आली आहे. शेअर केलेल्या या व्हिडीओमधील गाण्यात दीपिकाचा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक दिसत आहे. 'बेशरम रंग' या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घातलेल्या बिकीनीच्या भगव्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला.
पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या बातम्या :