Besharam Rang Song: 'अरेsss हे तर कॉपी'; शाहरुख, दीपिकाच्या 'पठाण'मधील गाण्यावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा
पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्याला नेटकरी ट्रोल करत आहेत. या गाण्यातील म्युझिक हे कॉपी केलेलं आहे, असा आरोप सध्या नेटकरी करत आहेत.
Besharam Rang Song: बॉलिवूडचा बादशाह ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यातील दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि शाहरुख यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली तर काही लोक या गाण्याला ट्रोल करत आहेत. बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला. आता या गाण्यातील म्युझिक हे कॉपी केलेलं आहे, असा आरोप सध्या नेटकरी करत आहेत.
मकेबा गाण्याची कॉपी केली?
ऋतिक रोशन आणि वाणी कपूर घुंगरु गाण्यातील म्युझिक आणि रेस-2 मधील व्हिज्युअल्स बेशरम गाण्यात कॉपी केल्याचा आरोप काही ट्विटर युझर्सनं ट्वीट शेअर करुन केला आहे. तसेच मकेबा गाण्यातील म्युझिक हे देखील या गाण्यात वापरण्यात आलं आहे, असं काही युझर्सचं मत आहे. 'जेव्हा मी बेशरम रंग ऐकला तेव्हा मलाही वाटले की मी हे म्युझिक कुठेतरी ऐकली आहे. हे मी माकेबामध्ये ऐकले आहे हे कळायला मला थोडा वेळ लागला.' असं ट्वीट एका युझरनं केलं आहे. अनेक यूजर्स या गाण्यावर संगीत चोरीचा आरोप करत आहेत. 'बेशरम रंग'चे संगीत विशाल ददलानी आणि शेखर रिझवानी यांनी दिले आहे.
नेटकऱ्यांचे ट्वीट्स:
Yep it bloody is.
— Karna (@FranciumKarna) December 12, 2022
Jain's song Makeba was plagiarised to create #BesharamRang for #Pathaan pic.twitter.com/glZPYHiwMO
The moment i heard #BesharamRang i was thinking where the hell i heard this beats before, well took me a while figured that this is Makeba by Jain anyway Great work @VishalDadlani and @ShekharRavjiani
— Haritosh Bhatt (@HaritoshBhatt) December 12, 2022
Not to mention the original creator @Jainmusic pic.twitter.com/k7p8vdpvez
#BesharamRang background is a complete copy of the Makeba song by Jain!
— Duke🦹🏾♂️🕺🏾🧘🏾♂️ (@imurugun) December 12, 2022
I do agree the tweaks made make it a bit more Bollywoody and catchy.
The similarity of the vibe of the entire song to Ghungroo from War is just non-ignorable.
250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट 8 देशांमध्ये शूट झाला आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तानमध्ये याचे चित्रीकरण झाले आहे.
पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Pathaan Movie: लाल सिंह चड्ढा, ब्रह्मास्त्रनंतर आता पठाणला बॉयकॉट करण्याची मागणी; हे आहे कारण