एक्स्प्लोर
जॉनच्या ‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर रिलीज
या सिनेमात जॉन भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढताना दिसत आहे. तर दुसरीकडे, मनोज वाजपेयी निगेटीव्ह रोलमध्ये प्रेक्षकांसमोर येत आहे. अॅक्शन आणि थ्रिलरचं अनोखं कॉम्बीनेशन सिनेमात पाहायला मिळेल.

मुंबई : अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी ‘सत्यमेव जयते’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे जॉनचा हा आणखी एक अॅक्शन पॅक सिनेमा असल्याचं ट्रेलरवरून दिसत आहे. सिनेमात जॉन अब्राहम अनेक अवघड स्टंट करताना दिसेल.
‘सत्यमेव जयते’ या सिनेमात जॉनसोबतच मनोज वाजपेयी आणि आयशा शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात जॉन भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढताना दिसत आहे. तर दुसरीकडे, मनोज वाजपेयी निगेटीव्ह रोलमध्ये प्रेक्षकांसमोर येत आहे. अॅक्शन आणि थ्रिलरचं अनोखं कॉम्बीनेशन सिनेमात पाहायला मिळेल.
‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना जॉनच्या ‘फोर्स’ सिनेमाची आठवण येऊ शकेल, असा हा सिनेमा आहे.
जॉनच्या ‘सत्यमेव जयते’ची बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’बरोबर टक्कर पाहायला मिळेल. कारण दोन्ही सिनेमे यावर्षी 15 ऑगस्टलाच रिलीज होत आहेत.
‘सत्यमेव जयते’ चे दिग्दर्शन मिलाप मिलन झवेरी यांनी केलं आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















