(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gaslight : सारा अली खानच्या 'गॅसलाईट'चा रहस्यमय ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; सस्पेन्स, थ्रील अन् बरचं काही
Gaslight : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या 'गॅललाईट' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Sara Ali Khan Gaslight Trailer Released : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) 'गॅसलाईट' (Gaslight) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सारा अली खानसह बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी आणि चित्रागंदा सिंहदेखील झळकत आहेत.
'गॅसलाईट'चा ट्रेलर रिलीज (Gaslight Movie Trailer Release)
साराच्या (Sara Ali Khan) आगामी 'गॅसलाईट' (Gaslight) या सिनेमाचा ट्रेलर डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या युट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आला आहे. 'गॅसलाईट' या सीरिजमध्ये सारा ही मिसा या दिव्यांग मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्या आईच्या भूमिकेत चित्रागंदा आणि वडिलांच्या भूमिकेत विक्रांत मेस्सी दिसणार आहे. 'गॅसलाइट'चा ट्रेलर पाहता सिनेमात सस्पेन्स, थ्रील, नाट्य, थरार अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतील याचा अंदाज येत आहे.
मिसाच्या वडिलांची हत्या होते. वडिलांच्या निधनानंतर मिशा अनेक गोष्टींचा कसा सांभाळ करते ते या सिनेमात दाखवण्यात आले आहे. या सिनेमात साराने एक वेगळी भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. सारा सध्या 'गॅसलाईट'च्या ट्रेलरमुळे चर्चेत आहे.
View this post on Instagram
'गॅसलाईट' कधी होणार रिलीज? (Gaslight Release Date)
'गॅसलाईट' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. सारा अली खान (Sara Ali Khan), विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) आणि चित्रागंदा सिंहचा (Chitraganda Singh) 'गॅसलाइट' हा सिनेमा 31 मार्चला डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
सारा अली खानचे आगामी सिनेमे (Sara Ali Khan Upcoming Movies)
सारा अली खानचा 'गॅसलाइट' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच तिचे 'ए वतन मेरे वतन' आणि 'मर्डर मुबारक', 'जगन शक्ति' आणि 'लक्ष्मण उतरेकर' हे सिनेमेदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर दुसरीकडे विक्रांत मेस्सी 'जिगरी यार', 'मुंबईकर','सेक्टर 36' आणि फिर आई हसीन दिलरुबा' सारख्या सिनेमांत झळकणार आहे.
संबंधित बातम्या